Sunday, August 2, 2026
spot_img
HomeRajura*सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यावर पो.स्टे राजुरा पोलिसांची कारवाई*

*सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यावर पो.स्टे राजुरा पोलिसांची कारवाई*

*सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यावर पो.स्टे राजुरा पोलिसांची कारवाई*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
*घटना काय घडली?*  
दिनांक *01/08/2026* रोजी पो.स्टे. राजुरा येथील गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, जोगापूर फाटा राजुरा येथे संशयीत इसमाच्या ताब्यातील एका महिंद्रा बोलेरो पिकअप *क्र. MH 34 BG 7094* मध्ये अवैध सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थ आहेत.
पंचासमक्ष वाहनाची झडती घेतली असता मागील डाल्यात मोठ्या प्रमाणात विविध ब्रँडचा तंबाखू, हुक्का-शिशा, विमल पान मसाला, सुपारी इ. मुद्देमाल आढळून आला.
*जप्त केलेला मुद्देमाल:*
1.  *होला हुक्का-शिशा तंबाखू* – 250 पाऊच × 200 ग्रॅम = *किंमत 66,250/- रु.*
2.  *ईगल हुक्का-शिशा तंबाखू* – 160 पाऊच × 200 ग्रॅम = *किंमत 76,800/- रु.*
3.  *ईगल हुक्का-शिशा तंबाखू* – 300 पाऊच × 40 ग्रॅम = *किंमत 25,500/- रु.*
4.  *क्रेज तंबाखू* – 44 पाऊच × 450 ग्रॅम = *किंमत 15,400/- रु.*
5.  *वी-1 तंबाखू* – 100 पॉकिट = *किंमत 4,500/- रु.*
6.  *महक चैनी प्रिमियम फिल्टर तंबाखू* – 476 पाऊच = *किंमत 10,472/- रु.*
7.  *केसर युक्त विमल पान मसाला* – 50 पाऊच = *किंमत 9,900/- रु.*
8.  *REX gold सुपारी* – 35 पॉकिट = *किंमत 2,100/- रु.*
9.  *वाहन* – महिंद्रा बोलेरो पिकअप *किंमत 8,00,000/- रु.*
*एकूण जप्त मुद्देमालाची किंमत: 10,10,922/- रुपये*
*आरोपीचे नाव:*  
*अर्जुन दयाशंकर तिवारी*
वय 28 वर्षे, रा. कोठारी, ता. बल्लारशाह, जि. चंद्रपूर
सदर आरोपीवर गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे.
*ही कारवाई कोणी केली?*  
मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी सा., मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे सा., मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर नंदनवार सा. यांच्या मार्गदर्शनात
पोलीस निरीक्षक नितिन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील सपोनी लक्ष्मण लोकर, सफो. किशोर तुमराम व इतर स्टाफ यांनी ही कारवाई केली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page