*पोलिस स्टेशन सिंदेवाही येथील घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडून उघड*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक ०९/०९/२०२६ रोजी फिर्यादी हे त्यांचे परिवारासह बाहेरगावी गेले असता त्यांचे घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 2,45,000 रुपया चा मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे दिल्याने अप.क्र. 547/2026 कलम 321(4),331(5),305 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी CCTV फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपी
1) सुनील शांताराम शिंदे वय 24 वर्ष राहणार बोरगाव टेकडी, सावंगी मेघे जिल्हा वर्धा
२) सुजल युवराज कुमरे वय 19 वर्ष राहणार बोरगाव टेकडी, सावंगी मेघे जिल्हा वर्धा यांना सावंगी मेघे येथून ताब्यात घेऊन सदर घरफोडी चा गुन्हा उघडकीस आणला आहे.
*जप्त मुद्देमाल :-*
१) सोन्याची मंगळसुत्र व सोन्याचे मणी तसेच सोन्याची जिवती,
२) चांदीचे कडे, चांदीचे पायपट्टी व गोप,
किंमत अंदाजे ₹ २,९३,३२७/- रू. चा मुद्देमाल
सदर बाबत पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे पुढील तपास सुरू आहे.
*कारवाई पथक :-*
उपविभाग वरोरा तसेच ब्रम्हपुरी पथक, स्था.गु.शा. चंद्रपूर