Wednesday, August 5, 2026
spot_img
HomeSanghtanaआ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला भोई समाजाची भक्कम साथ

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला भोई समाजाची भक्कम साथ

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला भोई समाजाची भक्कम साथ

चंद्रपूरातील भोई समाजातील १५२ महिला-पुरुषांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश
जनसेवेचे ध्येय समोर ठेवून एकदिलाने कार्य करण्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

*Jyotsna Wankhede* : राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर, सर्वसमावेशक कार्यपद्धतीवर आणि जनहितासाठी सातत्याने राबविलेल्या विकासकामांवर विश्वास व्यक्त करत चंद्रपूर शहरातील भोई समाजातील तब्बल १५२ महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. श्रीमती रेणूताई घोडेस्वार यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश सोहळा आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहात पार पडला. समाजातील विविध घटकांचा भाजपकडे वाढता कल आणि विकासाच्या राजकारणाला मिळत असलेला व्यापक पाठिंबा याचे हे प्रतीक मानले जात आहे.

यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाचा दुपट्टा खांद्यावर टाकून भोई समाजातील १५२ पुरुष व महिला कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष हा समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाला आणि जनसेवेला समर्पित पक्ष असल्याचे सांगितले. सर्वसामान्यांच्या विश्वासाच्या बळावर विकासाची वाटचाल अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी संघटन अधिक सक्षम करणे ही काळाची गरज असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले.  पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी समाजहित, राष्ट्रहित आणि जनसेवेचे ध्येय समोर ठेवून एकदिलाने कार्य करत भारतीय जनता पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही आ.मुनगंटीवार यांनी केले.

यावेळी राजू भामद्रे, संदीप भामद्रे, दीपक मेहसडे, सुरेश शिवदे, काशिनाथ जावरे, रोहित हंसकार, शिवम मांगुडकर, कैलाश शिंगाने, योगेश वाडीले, रतन चव्हाण, किशोर मोरे, लहू मोरे, दीपक सपकाळे, भगवान सूर्यवंशी, किशोर वानखेडे, संगीता शिवदे, वैशाली हजबन, मिराबाई सूर्यवंशी, कमल नंदाने, दिपाली मेहसडे, लक्ष्मी भामद्रे, ताराबाई शिवदे यांच्यासह भोई समाजातील एकूण १५२ महिला व पुरुषांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर, जनहिताच्या कार्यपद्धतीवर आणि सर्वसमावेशक विकासाच्या धोरणांवर विश्वास व्यक्त करत त्यांनी भारतीय जनता पक्षाची विचारधारा स्वीकारत विकासाच्या या वाटचालीत सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page