*ज्योत्स्ना वानखेडे*:
*माहिती काय आहे?*
चंद्रपूर जिल्हा *अमली पदार्थमुक्त* करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत.
याच अभियानाचा एक भाग म्हणून शाळा, महाविद्यालय परिसर तसेच जिल्ह्यात कुठेही *अमली पदार्थांची खरेदी-विक्री, सेवन किंवा गैरप्रकार* चालत असल्यास त्याची तात्काळ माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी चंद्रपूर पोलिसातर्फे *विशेष टिपलाईन मोबाईल क्रमांक* सुरू करण्यात आला आहे.
*टिपलाईन क्रमांकाची वैशिष्ट्ये आणि वापर:*
1. *टिपलाईन क्रमांक: 7887890100*
2. *माहिती देण्याचे माध्यम:* नागरिक, विद्यार्थी किंवा पालक या क्रमांकावर थेट *कॉल (Call)* करून किंवा *व्हॉट्सअॅप (WhatsApp)* द्वारे *मेसेज/व्हिडिओ/फोटो* पाठवून माहिती देऊ शकतात.
3. *नाव व माहितीची गोपनीयता:* या क्रमांकावर माहिती देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे *नाव, पत्ता व ओळख पूर्णपणे गोपनीय* ठेवण्यात येईल, याची ग्वाही पोलीस प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
*नागरिकांना व विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाचे आवाहन:*
शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुण पिढीला अमली पदार्थांच्या घातक विळख्यातून वाचवण्यासाठी आणि जिल्ह्यातील अमली पदार्थांची खरेदी-विक्री होणारी संशयित ठिकाणे *(हॉटस्पॉट्स)* उध्वस्त करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे.
आपल्या परिसरात किंवा शाळा, महाविद्यालय परिसरात अमली पदार्थांचे *सेवन, खरेदी-विक्री अथवा साठा* करण्याबत कोणतीही संशयास्पद हालचाल आढळून आल्यास नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी व पालकांनी *कसलाही भीती न बाळगता 7887890100* या टिपलाईन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
————————————————————————————————-
*अधिक माहितीसाठी:*
*Facebook:* SP Chandrapur | *Instagram:* chandrapur_police | *X:* spchandrapur