Sunday, August 9, 2026
spot_img
HomeChandrapurजागतिक आदिवासी दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन...

जागतिक आदिवासी दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन भगवान बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन भगवान बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन.

*Jyotsna Wankhede* : जागतिक आदिवासी दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरतर्फे महान स्वातंत्र्यसेनानी, जननायक आणि आदिवासी अस्मितेचे प्रतीक भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन व माल्यार्पण करण्यात आले. तसेच जिल्हा कारागृह, चंद्रपूर येथे आदिवासी समाजाच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

भगवान बिरसा मुंडा यांनी “अबुआ दिशुम, अबुआ राज” अर्थात “आपला देश, आपले राज्य” या स्वाभिमानाच्या विचारातून आदिवासी समाजाला अन्याय, शोषण आणि परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. जल, जंगल, जमीन, स्वाभिमान आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेला लढा आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे वीर बाबुराव शेडमाके यांनीही ब्रिटिश सत्तेविरुद्ध शौर्याने लढा देत आपल्या मातृभूमीसाठी बलिदान दिले. त्यांच्या त्याग व शौर्याला यावेळी अभिवादन करण्यात आले.

यानिमित्ताने भाजप महानगर कार्यालय, गांधी चौक येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा कारागृह येथे वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त निघालेल्या रॅलीचे हसन इलेक्ट्रिकलजवळ, मेन रोड, चंद्रपूर येथे शितपेय वाटप करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री रविंद्र गुरनुले, सविता दंढारे, प्रदेश कार्यकारिणी परिषद सदस्य तुषार सोम, उपाध्यक्ष बलराम डोडानी, ज्येष्ठ नेते अरुण तिखे, गटनेते चंद्रशेखर शेट्टी, नगरसेवक तथा अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष जितेश कुळमेथे, नितेश गवळी, भालचंद्र दानव, नगरसेविका आशा देशमुख, सरला कुळसंगे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष विमल काटकर, किसान मोर्चा अध्यक्ष संजय बुरघाटे, प्रवीण गिलबिले, दिवाकर पुद्दटवार, निलेश बेलखेडे, गणेश गेडाम, नीलिमा वनकर, माला पेंदाम, वैशाली मेश्राम, भाग्येश्री येरणे,रज्जन ठाकूर, सपना सातपुते, सविता ब्राम्हणे, कल्पना दुधे, प्रवीण पंचबुद्धे, कमलेश आत्राम, विठ्ठल कुमरे, दिवाकर मेश्राम, देविदास गेडाम, प्रकाश मेश्राम, विलास मसराम, राजेंद्र धुर्वे, कार्तिक कोडापे, कौस्तुभ मायकुलकर, सुरज गावंडे, पियुष अंडरस्कर, विठ्ठल कुंबरे, सिंधू मेश्राम, सुशीला आत्राम, सारिका मडावी, माला येडे, वंदना गेडाम, बंडू पेंदाम, नीळकंठ येरमे यांच्यासह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page