*बल्लारपुर शहरात काँग्रेस पक्षाच्या ओ.बी.सी. मंडल यात्रेचे आगमन*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
मंडल आयोगाचे अध्यक्ष स्व. बी. पी. मंडल यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओ.बी.सी. विभागाच्या वतीने मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले.
७ ऑगस्ट रोजी नागपूर येथून प्रारंभ झालेली ही यात्रा गोंदिया-भंडारा-गडचिरोली चंद्रपूर मार्गे ११ ऑगस्ट रोजी वर्धा येथील सेवाग्राम आश्रम येथे पोहोचली.
पूर्व विदर्भातील विविध जिल्ह्यांतून मार्गक्रमण करत आलेल्या काँग्रेसच्या ओ.बी.सी. मंडल यात्रेचे १० ऑगस्ट रोजी बल्लारपूर येथे आगमन झाले.
राजुरा येथे कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर बल्लारपूर येथे ओ.बी.सी. मंडल यात्रा पोहोचताच यात्रेचे नेतृत्व करणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओ.बी.सी. विभागाचे अध्यक्ष प्रा. डॉ. यशपाल भिंगे, उपाध्यक्ष मोरेश्वर भादे, राष्ट्रीय समन्वयक अजय हटवार, महासचिव गुरुदास चौधरी, जिल्हाध्यक्ष उमाकांत धांडे आदींचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. अलका वाढई, उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, नगरसेवक भास्कर माकोडे, अशोक चिताळे, गणपत इटनकर, नरेश आनंद, संजय झिल्लेवार, राजू मारमवार, नितीन सोयाम, विवेक खुटेमाटे आदींनी यात्रेत सहभागी नेते व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर ही मंडल यात्रा चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाली.