Wednesday, August 12, 2026
spot_img
Homeबल्लारपूर*निर्मल उज्ज्वल को-ऑपरेटिव्ह सोसायटी मल्टीस्टेट नागपूर, शाखा बल्लारपूर व्यवस्थापक व पदाधिकारी विरुद्ध...

*निर्मल उज्ज्वल को-ऑपरेटिव्ह सोसायटी मल्टीस्टेट नागपूर, शाखा बल्लारपूर व्यवस्थापक व पदाधिकारी विरुद्ध पोलीस स्टेशन बल्लारपूर मध्ये तक्रार*

*निर्मल उज्ज्वल को-ऑपरेटिव्ह सोसायटी मल्टीस्टेट नागपूर, शाखा बल्लारपूर व्यवस्थापक व पदाधिकारी विरुद्ध पोलीस स्टेशन बल्लारपूर मध्ये तक्रार*

*ज्योत्स्ना वानखेडे*: निर्मल उज्ज्वल को-ऑपरेटिव्ह सोसायटी मल्टीस्टेट, नागपूर, शाखा  बल्लारपूर येथील खातेदारांना मागील तीन ते चार महिन्यांपासून त्यांच्या खात्यातील पैसे मिळविण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार शाखेत जाऊनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त खातेदारांनी अखेर पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी निर्मल उज्ज्वल को-ऑपरेटिव्ह सोसायटी नागपूर ( मल्टीस्टेट ) च्या संबंधित पदाधिकाऱ्यांसह बल्लारपूर  शाखेतील व्यवस्थापकाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या वेळी मोठ्या संख्येने खातेदार व नागरिक पोलिस ठाण्यात उपस्थित होते.
खातेदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आपल्या कष्टाची बचत या संस्थेत ठेवली आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून पैसे काढण्यासाठी अडचणी निर्माण होत असून, शाखेकडून वारंवार वेगवेगळी कारणे सांगितली जात असल्याचा आरोप खातेदारांनी केला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच सर्वसामान्य बचतदार आर्थिक अडचणीत सापडल्याचे सांगण्यात येत आहे.
पैसे मिळण्यासाठी अनेकदा शाखेत चकरा मारूनही अपेक्षित तोडगा न निघाल्याने खातेदारांमध्ये नाराजी वाढली. अखेर संतप्त नागरिकांनी एकत्र येत संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर तसेच स्थानिक शाखा व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी केली.
शेकडो खातेदारांची उपस्थिती
या प्रकरणामुळे बल्लारपूर शहरात चर्चेला उधाण आले असून, शेकडो नागरिकांनी एकत्र येत आपल्या ठेवी परत मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून खातेदारांचे पैसे सुरक्षितपणे परत मिळवून देण्यात यावेत, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून तक्रारीची दखल घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया काय केली जाते, याकडे खातेदारांचे लक्ष लागले आहे. संस्थेच्या संबंधित अधिकाऱ्यांची बाजू तसेच पोलिस तपासातून नेमके काय समोर येते, हे स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
खातेदारांची मागणी : आमच्या कष्टाच्या पैशांची सुरक्षितता सुनिश्चित करून ठेवी तातडीने परत मिळाव्यात आणि खातेदारांना आर्थिक त्रास देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page