Thursday, August 13, 2026
spot_img
HomeYojnaदहेली येथे आर्थिक व डिजिटल साक्षरता शिबिर उत्साहात संपन्न

दहेली येथे आर्थिक व डिजिटल साक्षरता शिबिर उत्साहात संपन्न

दहेली येथे आर्थिक व डिजिटल साक्षरता शिबिर उत्साहात संपन्न

*ज्योत्स्ना वानखेडे*: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूरच्या वतीने नाबार्डच्या आर्थिक साक्षरता अभियानांतर्गत शाखा बलारपुर तर्फे दहेली येथे आर्थिक व डिजिटल साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), एटीएमचा वापर, केवायसी, पॅन कार्ड, आवर्ती ठेव, बचत खाते तसेच विविध प्रकारच्या कर्ज योजनांबाबत उपस्थित सभासद व नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली. डिजिटल बँकिंगचा सुरक्षित वापर, आर्थिक व्यवहारातील दक्षता आणि विविध बँकिंग सुविधांचा लाभ घेण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. डॉ . श्री अनिल वाढई यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच बँकेचे मा. विभागीय अधिकारी श्री प्रवीण वासाडे बचतगट विभाग प्रमुख श्री. अशोक पवार यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी निरीक्षक श्री. छगन येटे , सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश राजुरकर तसेच संस्थेचे सचिव दिनेश शेरकी तसेच संस्थेचे सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आधुनिक बँकिंग सेवा, डिजिटल व्यवहार आणि विविध शासकीय व बँकिंग योजनांची माहिती मिळून आर्थिक साक्षरतेला चालना मिळाली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page