*स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरची कामगिरी: धाडसी पाठलाग करत अवैध गोवंश वाहतूकदारांच्या आवळल्या मुसक्या!*
*15 लाखांच्या ट्रकसह 35 गोवंशांची अमानुष वाहतूक उधळली!*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
*प्रकरण काय घडले?*
चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच अवैध पशुवाहतुकीवर कठोर कारवाई करण्यासाठी चंद्रपूर पोलीस प्रशासन सतत प्रयत्नशील आहे.
*दि. 04 ऑगस्ट 2026* रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेने *(LCB)* गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई केली. एका अवैध आणि अमानुष पद्धतीने सुरू असलेल्या गोवंश वाहतुकीचा कट उधळून लावत पोलिसांनी केवळ मुद्देमाल जप्त केला नाही, तर *35 मुक्या प्राण्यांची भीषण त्रासातून सुटका* केली.
*घटनेची माहिती:*
पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका मोठ्या *10 चक्का ट्रकमधून* बेकायदेशीरपणे गोवंशाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी पडोली परिसरात नाकाबंदी लावली.
पहाटेच्या वेळी संशयित *10 चक्का टाटा ट्रक क्र. MH 31 CV 0817* नाकाबंदीवर आला असता पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला. मात्र चालकाने इशारा धुडकावून भरधाव वेगाने ट्रक भद्रावतीच्या दिशेने पळवला. यामुळे महामार्गावर मोठा धोका निर्माण झाला.
*धाडसी पाठलाग आणि अटक:*
पोलिसांनी संयमाने आणि कौशल्याने पाठलाग सुरू केला. अनेक किलोमीटर पाठलागानंतर *जुना सुमठाणा, सब स्टेशन पावर ग्रेड, भद्रावती* येथे पोलिसांनी ट्रकला गाठून ताब्यात घेतले.
ट्रकची पाहणी केली असता आत *31 गायी आणि 4 बैल असे एकूण 35 गोवंश* अत्यंत निर्दयी व अमानुष पद्धतीने कोंबून ठेवल्याचे आढळले. जागा नसल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होता. पोलिसांनी सर्व 35 गोवंशांची तात्काळ सुरक्षित सुटका केली.
या प्रकरणात *राकेशकुमार यावकराम टेकाम आणि मोसिन* हे दोघे फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
*जप्त मुद्देमाल – एकूण ₹22,35,000/-*
1. *गुन्ह्यात वापरलेला 10 चक्का टाटा ट्रक* – किंमत ₹15,00,000/-
2. *35 गोवंश* – किंमत ₹7,00,000/-
3. *2 मोबाईल हँडसेट* – किंमत ₹35,000/-
*गुन्हा नोंद:*
याप्रकरणी *पोलीस स्टेशन भद्रावती* येथे *प्राण्यांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1960 आणि भारतीय न्याय संहिता BNS 2023* च्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
सदर यशस्वी कामगिरी चंद्रपूरचे *पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी* व *अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे* यांच्या मार्गदर्शनाखाली, *स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे* यांच्या कुशल नेतृत्वात पार पडली.
या मोहिमेत *पोलीस निरीक्षक योगेश हिवसे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकर, पोलीस हवालदार सतीश आवठारे, इम्रान खान, लल्लू यादव, संदीप कांबळे, हिरालाल गुप्ता* तसेच *पोलीस अंमलदार किशोर वाकडे व शशांक बदाम* (स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) तसेच *सायबर पोलीस स्टेशनचे राहुल पोंदे व कार्तिक खनके* यांच्या पथकाने अत्यंत महत्वाची व धाडसी भूमिका बजावली.