Friday, August 14, 2026
spot_img
HomeGadchiroliसर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू, संस्थेचे अध्यक्ष माजी खासदारसह 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा...

सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू, संस्थेचे अध्यक्ष माजी खासदारसह 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू, संस्थेचे अध्यक्ष माजी खासदारसह 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

*ज्योत्स्ना वानखेडे*:

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील कुप्पा लिंगो या अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून तिन मुलींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार आणि त्यांच्या पुत्रासह एकूण 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, माजी खासदार आणि माजी मंत्री मारोतराव कोवासे, त्यांचे पुत्र व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष (संस्थेचे सचिव) विश्वजीत कोवासे यांच्यासह एकूण ५ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय मुख्याध्यापक प्रशांत तातपल्लीवार, अधीक्षक भाग्यश्री चिलमलवार आणि अधीक्षक भास्कर भोयर यांच्यावरही धनोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सरकारने या आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

10 ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली.कारणरू कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या या आश्रमशाळेत मुलींना झोपण्यासाठी खाटा नव्हत्या. सुमारे ५० विद्यार्थिनी जमिनीवर गाद्या टाकून झोपल्या होत्या. वसतिगृहाच्या खिडकीला जाळी नसल्याने उघड्या खिडकीतून मण्यार जातीचा विषारी साप आत शिरला आणि त्याने 6 मुलींना दंश केला. घटनेच्या वेळी वसतिगृहाची वॉर्डनही तेथे उपस्थित नव्हती. उपचारादरम्यान तीन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला, तर इतर तिघींवर उपचार सुरू आहेत.

सुश्मिता मंडल (14 वर्षे), दीपिका लकडा (12 वर्षे) आणि अनु कोरेटी (8 वर्षे). या विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर दीपिका मडावी (11 वर्षे), समृद्धी नैताम (14 वर्षे) आणि कविता किरंगा (12 वर्षे) या तीन मुलींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने हेलिकॉप्टरने नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी एअरलिफ्ट करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त केला जात असून आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नियमानुसार मुख्याध्यापक आणि अधीक्षकांनी रात्रीच्या वेळी शाळा/वसतिगृह परिसरातच मुक्काम करणे बंधनकारक होते. परंतु, घटनेच्या रात्री ते तेथे उपस्थित नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. तसेच संस्थेला शासकीय अनुदान मिळत असूनही मूलभूत सुविधा न पुरवणे आणि निष्काळजीपणा करणे या कारणास्तव सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.

या आश्रमशाळेला नियमित भेट देऊन तपासणी अहवाल सादर करण्याची जबाबदारी ज्या आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यावर होती, त्याला तातडीने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या अधिकाऱ्याने मासिक भेटी दरम्यान शाळेच्या दुरवस्थेची नोंद पद्धतशीरपणे का केली नाही, याची चौकशी केली जात आहे.

जपतलाई येथील या कुप्पा लिंगो शैक्षणिक संस्थेची मान्यता शासनाने कायमस्वरूपी रद्द केली आहे. या घटनेनंतर राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व 511 अनुदानित आदिवासी आश्रमशाळांचे सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page