Friday, August 14, 2026
spot_img
HomeChandrapurसावित्रीबाई फुले शाळेच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी तात्काळ द्या - आ. किशोर...

सावित्रीबाई फुले शाळेच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी तात्काळ द्या – आ. किशोर जोरगेवार तुकुम, वडगाव स्मशानभूमीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी, जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या बैठकीत आ. जोरगेवार यांचा आग्रह

सावित्रीबाई फुले शाळेच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी तात्काळ द्या – आ. किशोर जोरगेवार

तुकुम, वडगाव स्मशानभूमीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी, जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या बैठकीत आ. जोरगेवार यांचा आग्रह

*Jyotsna Wankhede*: बाबुपेठ येथील चंद्रपूर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळेच्या विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचे ठरले होते. मात्र, सदर निधी अद्याप उपलब्ध झालेला नसल्याने शाळेच्या प्रस्तावित विकासकामांना गती मिळत नाही. त्यामुळे पूर्वी ठरविण्यात आलेला पाच कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच शहरातील तुकुम आणि वडगाव येथील स्मशानभूमी बांधकामासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आवश्यक निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.        

    जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेच्या बैठकीत आ. किशोर जोरगेवार यांनी या मागण्या मांडल्या. चंद्रपूर शहरातील शैक्षणिक सुविधा तसेच मूलभूत नागरी सुविधांच्या विकासासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीचा प्रभावीपणे वापर करण्यात यावा, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

    बैठकीला पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, जिल्हाधिकारी वसुमना पंत, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले, पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी, आमदार उमा खापरे, आमदार हेंमत पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

             बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले शाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण, आवश्यक पायाभूत सुविधा आणि सुरक्षित परिसर उपलब्ध करून देण्यासाठी शाळेच्या विकासाची आवश्यकता आहे. यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचे यापूर्वी ठरले होते. मात्र, निधी उपलब्ध न झाल्याने प्रस्तावित विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे सदर निधी तातडीने वितरित करून विकासकामांना सुरुवात करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी आ. जोरगेवार यांनी केली.

  यावेळी आ. जोरगेवार यांनी तुकुम आणि वडगाव येथे स्मशाभुमीचे बांधकाम करत तेथे आवश्यक पायाभूत सुविधा, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, बैठक व्यवस्था तसेच इतर नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुकुम व वडगाव स्मशानभूमीसाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.  चंद्रपूर जिल्ह्यात खनिज उत्खननामुळे निर्माण होणार्या परिस्थितीचा परिणाम स्थानिक नागरिकांवर आणि शहरातील पायाभूत सुविधांवरही होत असतो. त्यामुळे जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. विशेषतः शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते आणि इतर नागरी सुविधांसोबतच अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आवश्यक सुविधा निर्माण करणेही महत्त्वाचे असल्याचे आ. जोरगेवार यांनी स्पष्ट केले.

  चंद्रपूर शहरातील शैक्षणिक आणि नागरी सुविधांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत असून संबंधित प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन प्रत्यक्ष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

One attachment  •  Scanned by Gmail

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page