Tuesday, August 18, 2026
spot_img
HomeWarora*वरोरा येथे पिस्टल व जिवंत काडतुसा सह आरोपी अटक स्थानिक गुन्हे शाखा...

*वरोरा येथे पिस्टल व जिवंत काडतुसा सह आरोपी अटक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ची कार्यवाही*

*वरोरा येथे पिस्टल व जिवंत काडतुसा सह आरोपी अटक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ची कार्यवाही*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक *१७/०८/२०२६* रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथक मा. पोलीस अधीक्षक साहेब, चंद्रपूर यांचे आदेशान्वये नागपंचमी सणानिमित्त पेट्रोलिंग तसेच अवैध धंद्यावर कार्यवाही करणे कामी वरोरा डिव्हीजन मध्ये रवाना होवुन पोलीस स्टेशन वरोरा परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरद्वारे गोपनीय खबर मिळाली की, सत्यम टॉकीजच्या मागे, वड्डार वस्ती, वरोरा येथे राहणार इसम नामे- *संग्राम लभाने* हा कोणता तरी खुना सारखा गंभीर दखलपात्र गुन्हा करण्याचे तयारीत असुन त्याने या उद्देशाने त्याचे राहते घरी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगुन ठेवले आहे.
अशा खबरेवरून स्थानिक गुन्हे शाखा चे पथकाने सत्यम टॉकीजच्या मागे, वड्डार वस्ती, वरोरा येथे राहणारा नामे-संघपाल उर्फ संग्राम वासुदेव लभाने*, वय ४६ वर्ष, याचे घरी जावुन अग्निशस्त्र संबंधाने रेड कार्यवाही केली असता, त्याचे घरझडतीत घरामध्ये एक पिस्टल अग्नीशस्त्र, दोन मॅग्झीन, १० जिवंत काडतुस अवैधरित्या मिळुन आल्याने नमुद मुद्देमाल व त्याचा मोबाईल असा एकुण *८५,०००/- रु. चा मुद्देमाल* जप्त करून नमुद आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी ताब्यात घेवून पोलीस स्टेशन वरोरा येथे *अपराध क्र. ९०२/२०२६ कलम ३,२५ भारतीय हत्यार कायदा* अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करून आरोपीस पुढील कार्यवाहीस पोलीस स्टेशन वरोरा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, श्री. *आयुष नोपाणी*, मा. अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री. *ईश्वर कातकडे*, पो. नि. श्री. *अमोल काचोरे*, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक *दिपक  काँक्रेडवार*, पोलीस उपनिरीक्षक *सर्वेश बेलसरे*, पोलीस उप निरीक्षक *सुनील गौरकार*, पोहवा /८११ *नितीन कुरेकर*, पोहवा/८१४ *सुभाष गोहोकार*, पोहवा/१४४६ *सचिन गुरनुले*, पोहवा/२२९६ *रजनीकांता पुठठावार* पोहवा/२१३८ *जय सिंह*, पोहवा/२५५५ *प्रमोद कोटनाके*, पोशि/९९ *अमोल सावे*, पोशि/१४३/ *विठ्ठल काकडे*, पोशि/६३० *प्रफुल पुप्पलवार*, पोशि २९१३ / *प्रतिक हेमके*, पोशि/२८७३ *अजित शेंडे*, पोशि/२८५१ *सुमित बरडे* चालक पोहवा/२३१० *दिनेश अराडे*, चालक पोहवा/६०६६ *मिलिंद टेकाम* चालक पोहवा/२५५४ *गजानन मडावी* यांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page