Wednesday, August 19, 2026
spot_img
HomeWarora*वरोरा येथे पिस्टल सह आरोपी अटक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व पोलीस...

*वरोरा येथे पिस्टल सह आरोपी अटक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व पोलीस स्टेशन वरोरा ची संयुक्त कार्यवाही*

*वरोरा येथे पिस्टल सह आरोपी अटक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व पोलीस स्टेशन वरोरा ची संयुक्त कार्यवाही*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक *17/08/2026* रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथक व पोलीस स्टेशन वरोरा चे गुन्हे शोध पथक हे वरोरा शहरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीरद्वारे गोपनीय खबर मिळाली की, *संतोष सेलोकार*, रा. मित्र चौक, वरोरा याने त्याचे राहते घरी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगुन ठेवले आहे.
अशा गोपनीय खबरवरून स्थानिक गुन्हे शाखा चे पथक व पोलीस स्टेशन वरोरा येथील गुन्हे शाखा शोध पथकाने संयुक्तरित्या मित्र चौक, वरोरा येथील *संतोष दादाजी सेलोकार*, वय 48 वर्ष याचे राहते घरी जावुन अग्निशस्त्र संबंधाने रेड कार्यवाही केली असता, त्याचे घरझडतीत घरामध्ये एक पिस्टल अग्निशस्त्र मॅग्झीन सह कि.अ. *50,000/- रु. चा मुद्देमाल* अवैधरित्या बिनापरवाना मिळुन आल्याने सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, नमुद आरोपीकडे मिळालेले अग्निशस्त्र त्याने कोठुन आणले, याबत विचारणा केली असता, त्याने मित्र चौक, वरोरा येथे राहणारा त्याचा नातेबाईक *देवा नौकरकार* व त्याची पत्नी *सौ. भाग्यश्री देवा नौकरकार* यांनी त्याचे राहते घरी सदरचे अग्निशस्त्र आणुन दिल्याचे सांगितले.
नमुद आरोपीस पोलीस स्टेशन वरोरा येथे आणुन आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन वरोरा येथे *अपराध क्रमांक 904/2026 कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा* अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पाहीजे आरोपी देवा नौकरकार व त्याची पत्नी सौ. भाग्यश्री देवा नौकरकार यांचा शोध सुरु असुन गुन्ह्याचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.
*सदरची कारवाई* मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर श्री. *आयुष नोपानी*, मा. अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर श्री. *ईश्वर कातकडे*, पो.नि. श्री. *अमोल काचोरे*, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर, पो.नि. श्री. *ओमप्रकाश सोनटक्के*, पो.स्टे. वरोरा यांचे मार्गदर्शनात सपोनि *श्री. शरद भस्मे*, सपोनि *लक्ष्मी चौधरी*, पोउपनि *सर्वेश बेलसरे*, पोहवा/814 *सुभाष गोहोकार*, पोहवा/1446 *सचिन गुरनुले*, पोहवा/2296 *रजनीकांत पुठठावार*, पोहवा/711 *सुखराज यादव*, पोहवा/924 *अमोल नवघरे*, पोशि./143 *विठ्ठल काकडे*, पोअं./630 *प्रफुल पुप्पलवार*, पोअं./2913 *प्रतिक हेमके*, पोअं./2643 *महेश गावतुरे*, पोअं./1053 *सौरभ कुलथे*, मपोअं./156 *पुजा मोहुर्ले*, मपोअं./1954 *दिपाली देशमुख*, चापोहवा/2310 *दिनेश अराडे*, चापोहवा/ *प्रशांत बावणे* यांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page