Wednesday, August 19, 2026
spot_img
HomeNagpurसुजान चौधरी यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली रुग्णालयात भेट

सुजान चौधरी यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली रुग्णालयात भेट

सुजान चौधरी यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली रुग्णालयात भेट

*Jyotsna Wankhede*: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे चंद्रपूर विभाग संघटनमंत्री सुजान चौधरी हे संघटनात्मक प्रवासादरम्यान झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांनी रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देत त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी डॉक्टरांकडून सुजान चौधरी यांच्या प्रकृतीची माहिती घेतली तसेच सुरू असलेल्या उपचारांची सविस्तर माहिती जाणून घेतली. उपचारांना सकारात्मक प्रतिसाद  असून, त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही बाब निश्चितच दिलासादायक असल्याचे आमदार जोरगेवार यांनी म्हटले.
सुजान चौधरी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. संघटनात्मक जबाबदारी पार पाडताना प्रवासादरम्यान त्यांच्यावर हा दुर्दैवी अपघात ओढवला. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊन त्यांनी पुन्हा नव्या जोमाने सामाजिक व संघटनात्मक कार्यात सक्रिय व्हावे, अशी भावना आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page