*अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीस पोक्सो कायद्या अंतर्गत २० वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक २७/०८/२०२२ रोजी सकाळी १०/१५ ते ११/०० वाजेच्या सुमारास मौजा वांद्रा येथील गुरूकुंज आश्रम देवस्थान परिसरात ५ वर्षीय अल्पवयीन बालीका खेळत असताना, आरोपी नामे युवराज बळीराम मेश्राम वय ३० वर्ष रा. वांद्रा ता. ब्रम्हपुरी याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला असता बालीका जोरात ओरडली तेव्हा फिर्यादी काय झाले? हे पाहण्यासाठी गेला असता आरोपी पळून जाताना दिसला. अशा फिर्यादीचा रिपोर्ट वरून पोलीस ठाणे ब्रम्हपुरी येथे तत्परतेने गुन्हा रजीस्टर क्र. ४३७/२०२२ कलम ३७६(एबी) भादवी सह ६,१० पोक्सो कायदा २०१२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आले. गुन्ह्याचा सखोल तपास करून तपासी अधिकारी यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल व परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून मा. न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र दाखल केले.
*मा. न्यायालयचा निकाल*
सदर खटल्याची सुनावणी मा. श्री. पि. एम. गुप्ता, जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोकता सुधाकर डेगावार यांनी मांडण्यात आलेला युक्तीवाद व सादर केलेले साक्ष पुरावे मा. न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपीस दिनांक २१/०८/२०२६ रोजी आरोपीस कलम ६ पोक्सो कायद्यान्वये २० वर्ष सश्रम कारावास व ५,००० रू दंड दंड न भरल्यास १ महिन्याचा साधा कारावास तसेच नुकसानभरपाई दंडाची संपुर्ण ५,००० रू रक्कम पिडीतेस देण्याचे आदेश.
*तपास, मार्गदर्शक व न्यायालयीन पैरवी अधिकारी*
– तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी
– सरकारी अभियोकता ॲड सुधाकर डेगावार
– कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार प्रकाश नागोराव शेंदरे ब.न. २२७ पोस्टे ब्रम्हपुरी
– दोषसिध्दी कक्ष, चंद्रपूर
सदर कामगिरी मा. आयुष नोपाणी पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर व उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी, यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आली.