Friday, July 31, 2026
spot_img
HomeEducationमोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे इयत्ता दहावी व...

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

ज्योत्स्ना वानखेडे:
मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. सादिक जव्हेरी सर, शाळेच्या प्राचार्या असमा खान मॅडम तसेच मुख्याध्यापिका हर्षा वरगंटवार मॅडम, पर्यवेक्षिका सुनिता कांबळे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. सादिक जव्हेरी सर यांनी प्रत्येकाने आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याकरिता मेहनत घेणे खूप गरजेचे आहे व सर्वजण आपले ध्येयापर्यंत पोहोचतील अशी आशा करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या आठवणी तसेच शाळेविषयी असलेले प्रेम आपल्या शब्दातून व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांना शिकविणाऱ्या तुषार चौधरी सर, सीमा सोमनकर मॅडम,सुनिता कांबळे मॅडम या शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांवर असलेले प्रेम आपले शब्दातून व्यक्त केले व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकरिता तसेच ध्येय गाठण्याकरिता शुभेच्छा दिल्या. इयत्ता बारावीची विद्यार्थिनी लुबेंना शेख हे आपल्या शाळेविषयी तसेच शिक्षकाविषयी प्रेम व्यक्त करीत असताना व विद्यालयातील चांगल्या शिक्षणाविषयी सांगत असताना तिचे मन गहिवरून आले. शाळेच्या प्राचार्य असमा खान मॅडम यांनी आपल्या निरोपिय भाषणातून विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याकरिता प्रेरणात्मक मार्गदर्शन करून पुढील शिक्षणाकरिता शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे संचालन नाजमी मॅडम व शैलेजा मॅडम यांनी केले तर मीना शेंडे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page