Saturday, August 22, 2026
spot_img
HomeNagpur*८ प्रकरणे 'ऑन द स्‍पॉट' निकाली*

*८ प्रकरणे ‘ऑन द स्‍पॉट’ निकाली*

*८ प्रकरणे ‘ऑन द स्‍पॉट’ निकाली*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
नागपूर येथे २० ऑगस्‍ट २०२६ रोजी नागपूर येथे विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर व शिक्षणाधिकारी (माध्य.), जि.प. नागपूर यांच्या कार्यालयात शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत बैठक घेतली. या दोन्‍ही बैठकीत एकूण ८ प्रकरणांना ‘ऑन द स्‍पॉट’ मान्‍यतेचे पत्र देण्यात आले.
शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या दालनात नागपूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. यात काही प्रकरणे अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्‍याने तात्‍काळ या प्रकरणांना मान्‍यता देण्यात निर्देश शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना दिले. त्‍यानुसार त्‍यांनी त्‍यांच्या अधिनस्‍त ४ प्रकरणांना ‘ऑन द स्‍पॉट’ मान्‍यतेचे पत्र माझ्या हस्‍ते देण्यात आले.
यात मोहम्मद शोएब खान (सहा. शिक्षक, किदवाई एज्‍युकेशनल ॲन्‍ड कल्‍चरल सोसायटी टेका) यांना प्रभारी मुख्याध्यापक पदाचे आर्थिक व प्रशासकीय अधिकार, प्रदीप शंकर पाटील (सहा. शिक्षक, वसंतराव नाईक कृषी विद्यालय व क. महाविद्यालय, सिर्सी, ता. उमरेड) यांना वरिष्ठ श्रेणी, सुनील देविदास सोलव (सहा. शिक्षक, लखोदिया भूतडा हायस्कूल कोढाली) यांना पर्यवेक्षक पदावरील पदोन्नतीस मंजुरी तर प्रणिता पुरुषोत्तम जाेगी (सहा. शिक्षक, जनता हायस्कूल, नागपूर) यांच्या नाव बदलास मंजुरी प्रदान करण्याबाबत मान्‍यतेचे पत्र ‘ऑन द स्‍पॉट’ देण्यात आले.
तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या अधिनस्त ४ प्रकरणांना ‘ऑन द स्‍पॉट’ मान्‍यतेचे पत्र देण्यात आले. यात मृणाली देवगडे (शिपाई सेवक, संत नगाजी महाराज माध्यमिक विद्यालय डोरली (भिंगारे) ता. काटोल), मोहम्मद कय्यूम मोहम्मद याकुब (शिक्षण सेवक, रोशन उर्दु हायस्कूल, टेका),   मोहम्मद शकीब अखतर मोहम्मद जलील (शिक्षण सेवक, रोशन उर्दु हायस्कूल, टेका) व सुनिता गंगाराम जाधव (सहा. शिक्षीका, स्‍वामी नरेंद्रनाथ विद्यालय पाटण (चिखली) ता. जिवती, जि. चंद्रपूर) यांचे शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यास ‘ऑन द स्‍पॉट’ मान्‍यतेचे पत्र देण्यात आले.
यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष श्री. रमेश काकडे, कोषाध्यक्ष श्री. भूषण तल्‍हार, नागपूर ग्रामीण जिल्‍हाध्यक्ष श्री. अनिल गोतमारे, जिल्‍हा कार्यवाही श्री. संजय वारकर, महानगर कार्यवाह श्री. अविनाश बडे, मोहम्मद शोएब खान व जिल्‍हा पदाधिकारी, शिक्षक उपस्‍थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page