Tuesday, August 25, 2026
spot_img
HomeMul*मूल पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी*

*मूल पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी*

*मूल पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी*

*CEIR पोर्टलच्या व सायबरसेल चंद्रपूर यांच्या माध्यमातून हरवलेले मोबाईल हस्तगत करून तक्रारदारांना केले सुपूर्द*

*ज्योत्स्ना वानखेडे*:

पोलीस स्टेशन मुल, जिल्हा चंद्रपूर

मार्गदर्शन करणारे अधिकारी

१) श्री. आयुष नोपानी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर २) श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर ३) श्री. विजय राठोड पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मुल

कार्यवाही करणारे अधिकारी व अंमलदार

पोलीस स्टेशन मुल १) सपोनि सुरेश कन्नाके २) पोहवा. नरेश कोडापे ब.नं. १८३ ३) पोअं. दिलीप आदे ब.नं. २७१० ४) पोअं नरेंद्र वाकडे ब.नं. २६२३ ५) पोअं. प्रकाश चिकराम ब.नं. २३९७ ६) पोअं शंकर बोरसरे ब.नं. १२३२ ७) सायबर सेल चंद्रपूर

*हकीकत:-*

मूल पोलीस स्टेशन हद्दीत विविध ठिकाणी हरवलेले/गहाळ झालेले मोबाईल फोन शोधून काढण्यासाठी Central Equipment Identity Register (CEIR) पोर्टलचा प्रभावी वापर करण्यात आला. CEIR पोर्टल व सायबरसेल चंद्रपूर यांच्या माध्यमातून तांत्रिक तपास करून एकूण ६ हरवलेले मोबाईल फोन हस्तगत करण्यात मूल पोलिसांना यश आले असून, सदर मोबाईल संबंधित सहा तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत. सन २०२६ आजपावेतो एकूण २२ हरवलेले मोबाईल फोन हस्तगत करून तक्रारदार यांना परत करण्यात आले आहे.

*हरवलेल्या मोबाईलचा तांत्रिक तपास*

मूल पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी त्यांचे मोबाईल फोन हरवल्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी/नोंदी दिल्या होत्या. सदर मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी त्यांचे IMEI क्रमांक CEIR पोर्टलवर नोंदवून तांत्रिक पद्धतीने तपास करण्यात आला. CEIR प्रणालीच्या माध्यमातून हरवलेल्या मोबाईल फोनच्या IMEI क्रमांकावर लक्ष ठेवून सदर मोबाईल फोनमध्ये नवीन SIM कार्ड वापरले गेल्यानंतर प्राप्त होणाऱ्या तांत्रिक माहितीच्या आधारे मोबाईलचा शोध घेण्याची कार्यवाही करण्यात आली. तपासादरम्यान CEIR पोर्टलवर प्राप्त झालेल्या माहितीचे विश्लेषण करून संबंधित मोबाईल फोनचा वापर करणाऱ्या व्यक्तींची माहिती प्राप्त करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आवश्यक ती कार्यवाही करून एकूण सन २०२६ आजपावेतो एकूण २२ हरवलेले मोबाईल फोन हस्तगत केले. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल फोनची पडताळणी करून ते संबंधित तक्रारदारांचेच असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना/तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले.

*मूल पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी*

CEIR पोर्टल व सायबर सेल चंद्रपूर यांच्या माध्यमातून तांत्रिक तपास करून हरवलेले मोबाईल शोधून काढणे आणि ते त्यांच्या मूळ मालकांना परत करणे ही नागरिकाभिमुख पोलीस कार्यवाही असून, यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होत आहे.

सदर कारवाई श्री. आयुष नोपानी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री. विजय राठोड पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मुल यांच्या मार्गदर्शनात, पोलीस स्टेशन मुल येथील तपास पथक सपोनि. सुरेश कन्नाके, पोहवा. नरेश कोडापे ब.नं. १८३, पोअं. दिलीप आदे ब. न. २७१०, पोअं नरेंद्र वाकडे ब. नं २६२३, पोअं. प्रकाश चिकराम ब.नं. २३९७ ,पोअं शंकर बोरसरे ब न १२३२ व सायबर सेल चंद्रपूर यांनी केली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page