*ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ३० इसमांना मूल शहरात वास्तव्यास राहण्यास प्रतिबंध*
*ज्योत्स्ना वानखेडे*: ईद-ए-मिलाद सणाच्या अनुषंगाने मूल शहर व पोलीस स्टेशन मुल हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सण शांततेत पार पडावा तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मुलकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163(2) अन्वये जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार, पोलीस स्टेशन मुल हद्दीतील अवैध दारू विक्री करणारे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांपैकी एकूण ३० इसमांना दिनांक 25/08/2026 ते दिनांक 26/08/2026 या कालावधीत मूल शहरात वास्तव्यास राहण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
सदर प्रतिबंधात्मक कारवाईचा मुख्य उद्देश ईद-ए-मिलाद सणाच्या कालावधीत शांतता, सुव्यवस्था व सामाजिक सलोखा अबाधित राखणे हा आहे.
प्रतिबंधित इसमांची नावे
1. आकाश अजय राम, वय ३२ वर्षे
2. गौरव नितीन नरूले, वय २६ वर्षे
3. अंकुश अनिल कोडापे, वय २३ वर्षे
4. साहील पन्नालाल डोहने, वय २४ वर्षे
5. संजुसिंग संतोषसिंग पटवा, वय २६ वर्षे
6. कुणाल भिमानंद चिकाटे, वय २६ वर्षे
7. स्वप्नील विठ्ठल कच्चेवार, वय ४२ वर्षे
8. मल्लेश किष्टया गनमेनवार, वय ४५ वर्षे
9. राहुल आनंदराव चलाख, वय २८ वर्षे
10. गंगाधर नागा इंदुलवार, वय ४२ वर्षे
11. प्रशिक विशाल बारसागडे, वय १९ वर्षे
12. मयुर सत्तार शेख, वय २५ वर्षे
13. सचिन लक्ष्मण मुळेवार, वय ३५ वर्षे
14. राहुल अंबादास बडगे, वय ३५ वर्षे
15. विलास केशव जक्कुलवार, वय ४८ वर्षे
16. करणसिंग ओंकारसिंग पटवा, वय २९ वर्षे
17. तोहीद आरीफ शेख, वय २५ वर्षे
18. संजय मारोती गेडाम, वय ४५ वर्षे
19. करण शशिकांत डोलीकर, वय २६ वर्षे
20. रमण विलास डोर्लीकर, वय २६ वर्षे
21. अंकुश सुधाकर सोनुलवार, वय ३६ वर्षे
22. मनोज दिलीप मोहुर्ले, वय ४८ वर्षे
23. बंडु वानुजी सुखदेवे, वय ४६ वर्षे
24. बंडु गोसाई मानकर, वय ४८ वर्षे
25. निरंजन ढेकलु मानकर, वय ४३ वर्षे
26. उमेश दिवाकर कन्नाके, वय ३५ वर्षे
27. प्रविण गुरुदास खोब्रागडे, वय ५१ वर्षे
28. साईनाथ फकिरा राउत, वय ३८ वर्षे
29. पंकज सुरेश जुमडे, वय ४२ वर्षे
30. शोएब वसीम पठाण, वय २८ वर्षे
पोलीस प्रशासनाचे आवाहन
ईद-ए-मिलाद सण शांततेत, उत्साहात व सामाजिक सलोख्याने साजरा करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. कोणत्याही प्रकारच्या अफवा, गैरसमज किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कृतींना बळी पडू नये.
कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलिस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उप विभागीय पोलीस अधिकारी मुल श्री. सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मुलचे अधिकारी व अंमलदार ईद-ए-मिलाद सणाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क राहणार आहेत.
— पोलीस स्टेशन मुल, जि. चंद्रपूर