Friday, September 11, 2026
spot_img
HomeChandrapur*चोरीस गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल जप्त: स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*

*चोरीस गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल जप्त: स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*

*चोरीस गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल जप्त: स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक ०८/०९/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे चंद्रपूर शहर परिसरात कारवाई करून ०२ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त करण्यात आली.
    सदर मोटारसायकलबाबत पोलीस ठाणे वाडी, जिल्हा नागपूर येथे अप. क्र. ५६३/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
उघडकीस आलेला गुन्हा :
पोलीस ठाणे – वाडी, जिल्हा नागपूर
अपराध क्रमांक – ५६३/२०२६
कलम – ३०३(२), भारतीय न्याय संहिता
जप्त मुद्देमाल :
हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल, नोंदणी क्र. MP-20-MH-8135, अंदाजे किंमत ₹५०,०००/-
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी :
१) गोपाल ऊर्फ कोब्रा जीवन मालाकर, वय २७ वर्षे, रा. इंदिरानगर, चंद्रपूर.
२) यमला तंगराज कोरवान, वय ३५ वर्षे, रा. इंदिरानगर, चंद्रपूर.
सदर दोन्ही आरोपी व जप्त मोटारसायकल पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाणे वाडी, जिल्हा नागपूर यांच्या ताब्यात देण्यात आले.
कारवाई करणारे पथक :
चंद्रपूर उपविभाग पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page