*शहर काँग्रेस कमिटी, बल्लारपूर यांच्या वतीने तान्हा पोळा निमित्त आयोजित नंदी सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा संपन्न*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटी, बल्लारपूर यांच्या वतीने तान्हा पोळा निमित्त आयोजित नंदी सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
या उपक्रमासाठी इस्माईल ढाकावाला-अल्पसंख्य शहर अध्यक्ष कॉग्रेस,गणपत ईंटनकर-ओ.बी.सी. शहर अध्यक्ष बल्लारपूर, अशोक चितळे-माजी नगरसेवक, नितीन सोयाम-अध्यक्ष अनुसूचित जमाती, संजय झिलेवार व इतर सर्व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी सौ. डॉ. अल्का अनिल वाढई (नगराध्यक्षा, न.प.बल्लारपूर) तसेच श्री. डॉ. अनिल सदाशिव वाढई (संचालक, जि. म. स. बँक, चंद्रपूर) यांची विशेष उपस्थिती लाभली. या स्पर्धेचे निरिक्षक म्हणून वसंतजी खेडेकर- वरिष्ठ पत्रकार, श्रावण बनासुरे मनीष कायरकर, प्रवीण विघ्नेश्वर, दर्शना मोगरे यांनी जबाबदारी पार पाडली.
यावेळी श्री. देवेंद्र आर्या (उपाध्यक्ष), श्री. अब्दुल करीम शेख (शहर अध्यक्ष), दीपक धोपटे-(जिल्हा कार्यवाह) तसेच नगरसेवक म्हणून भास्कर माकोडे, शारदा माकोडे, वैशाली हुमने, वैश्नवी जुमडे, अंकू बुक्के, मोना धनोरकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात नंदी सजावटीची पाहणी, सहभागी बालगोपालांचे कौतुक तसेच टिफिन बॉक्सचे वितरण करण्यात आले. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना सायकलचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी अल्का वाढई मॅडम यांनी आपल्या मनोगतातून तान्हा पोळ्यासारख्या पारंपरिक सणांमधून संस्कृती व परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व सांगत सर्व विजेते बालगोपालांचे कौतुक केले.