*जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथे ‘एड्स जनजागृती’ अंतर्गत शाळा संवेदीकरण कार्यक्रम संपन्न*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
जनता विद्यालय सिटी ब्रँच, बल्लारपूर येथे *जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर आणि आय.सी.टी.सी. बल्लारपूर* यांच्या संयुक्त विद्यमाने *’इंटेन्सिफाईड आय.ई.सी. कॅम्पेन’* अंतर्गत *शाळा संवेदीकरण व एड्स जनजागृती* कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका *आर. ए. गंधारे,* पर्यवेक्षिका *पी. जे. गंगमवार,* शिक्षक *जी. एस. उमरे* आणि प्रमुख *मार्गदर्शिका* म्हणून *स्मिता काकडे* जिल्हा ग्रामीण रुग्णालय चंद्रपूर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका आर. ए. गंधारे यांनी प्रमुख मार्गदर्शिका स्मिता काकडे यांचे पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने सहर्ष स्वागत केले.
यानंतर मुख्य मार्गदर्शनामध्ये स्मिता काकडे यांनी उपस्थित *विद्यार्थ्यांना एड्स (HIV/AIDS) या आजाराविषयी विस्तृत आणि सखोल* माहिती दिली. या आजाराची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, समाजात असणारे गैरसमज आणि किशोरवयीन मुलांनी घ्यावयाची काळजी याविषयी त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच *राष्ट्रीय एड्स नियंत्रण* संस्थेच्या _१०९७_ (1097) या हेल्पलाइन क्रमांकाची माहिती देऊन जनजागृती केली.
या प्रसंगी शाळेतील शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.