*दोन विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन चोरीस गेलेले ०४ दुचाकी वाहन जप्त*
*१,३५,००० रु चा मुद्देमाल जप्त*
*स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरची कार्यवाही*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दि. ०७/०९/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांना गुप्तबातमीदाराकडुन माहिती मिळाली की, दोन विधीसंघर्षग्रस्त बालक इसम हे चोरीचे वाहन विक्रीकरीता घेवुन फिरत आहेत वरून रामसेतु पुलीया या ठिकाणी सापळा रचुन दोन विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले असता त्यांचेकडे पोस्टे रामनगर अप क्र. १०५७/२०२६ कलम ३०३(२) भा.न्या.स. या गुन्ह्यातील व पोस्टे घुग्गुस अप क्र. २८०/२०२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहीता २०२३ या गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटारसायकल मिळून आली.
जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीचे घटनाबाबत माहिती घेवुन तसेच दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे तांत्रीक तपास करुन विचारपुस केली असता त्यांनी पोस्टे भद्रावती अप क्र. ८८४/२०२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहीता २०२३, पोस्टे गडचांदूर अप क्र. ४७२/२०२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहीता २०२३ या गुन्ह्यातील मोटार सायकल चोरी केल्या असल्याबाबत कबुल केले. दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे चोरीस गेलेल्या ०४ मोटार सायकल मिळून आल्याने एकुण १,३५,०००/-रु चा माल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.
सदरची कार्यवाही मा.श्री.आयुष नोपानी पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा.श्री.ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्री.अमोल काचोरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांचे नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकार, पोहवा रजनीकांत पुठ्ठावार, पोहवा सचिन गुरनुले, पोहवा सुभाष गोहोकार, पोअं प्रतिक हेमके, पोअं विठ्ठल काकडे, पोअं/ प्रफुल पुप्पलवार पोशी/दिनेश अराडे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.