स्वरांजली परिवार प्रस्तुत सदाबहार गीतांच्या सादरीकरणाने श्रोते मंत्रमुग्ध.
श्रेयश वानखेडे: नूतन विद्यालय येथील रा. ब. गिल्डा सभागृहात सदाबहार गीते हा नव्या जुन्या हिंदी मराठी सदाबहार गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
मान्यवरांचे हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.या प्रसंगी ‘ जय शारदे वागीश्वरी ‘ ….सौ पूजा तोडकर यांनी सादर केले. चांद सी महबुबा…., मोह मोह के धागे…., दिल दिवाना….,चंदन सा बदन…, ये राते ये मौसम…,सावन का महिना…, रेशमाच्या रेघांनी.., मुसाफिर हू यारो…, अजीब दास्ता है ये….,पहिले न मी तुला…, कोई रोको ना…, दिल की नजर से…, फिजा भी है जवा जवा…, आरी आजा निंदिया… , ए मेरे दिल कहीं ओर चल…, ओ मेरी महबूबा…, देखो रूठा ना करो…., तु ही मेरी शब है…., ये दोस्ती, ग साजने… इत्यादी गाणी कलाकारांनी सादर करून उपस्थित रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.या मध्ये गंगाधर कान्हेकर,प्रीती सराफ, मनिषा पांडे,उल्हास पांडे, डॉ राजेंद्र मुळावेकर, प्रिती राठी, देवांश तोडकर, डॉ.माधुरी कामखेडे , सच्चीदानंद डाखोरे, दिपक देवा, संजय मंडलिक, डॉ विलास मोरे,सतीश ताठे,या कलाकारांनी गीते सादर केली.या प्रसंगी प्राचार्य डॉ.विनायक कोठेकर, गोविंदभाऊ जोशी,रामराव रोडगे, प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी , ॲड सुभेदार,महेश खारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी अखिल भारतीय गांधर्व महा विद्यालय मंडळाच्या वतीने,पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर कला गौरव पुरस्कार जाहीर झालेले यशवंत चारठाणकर यांचा स्वरांजली परिवार व श्रुती संगीत विद्यालय सेलूच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे संयोजक रवी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले, तर रवी मुळावेकर,केशव डहाळे,अरुण रामपूरकर, कृष्णा आळणे यांनी परिश्रम घेतले.मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.