Monday, May 25, 2026
HomeParbhaniसेलूत हुतात्मा बहिर्जी शिंदे नायक यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.
spot_img

सेलूत हुतात्मा बहिर्जी शिंदे नायक यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.

सेलूत हुतात्मा बहिर्जी शिंदे नायक यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.

नगरपरिषद प्रशासनास पडला बहिर्जी शिंदे यांचा विसर.

श्रेयश वानखेडे  : दि.१९ जुलै शनिवार रोजी सेलू शहरातील ऐतिहासिक घडी टॉवर मधील हुतात्मा बहिर्जी शिंदे नायक यांच्या अर्धाकृती पुतळ्यास सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्या तील हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील  वापटी या गावचे क्रांतिकारक हुतात्मा बहिर्जी शिंदे यांचा जन्म दिनांक 30 मार्च 1920 तर शहीद दिन 19 जुलै 1948 हुतात्मा बहिर्जी शिंदे यांचा स्मृतिदिन सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वच्छ करून अभिवादन केले. मागील 10 वर्षापासून नगरपालिका प्रशासन अभिवादन सोहळा साजरा करत होती.परंतु यावर्षी सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी निवेदन दिलेले असूनही सेलू नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना हुतात्मा बहिर्जी शिंदे यांचा विसर पडला सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी या नगरपालिका प्रशासनाचा निषेध म्हणून  आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की नगरपालिका प्रशासनास लेखी निवेदन देऊनही यावर्षी 19 जुलै हुतात्मा बहिर्जी शिंदे यांचा नगरपालिका प्रशासनास विसर पडला असून आम्ही  सर्व सामाजिक कार्यकर्ते नगर परिषद प्रशासनाचा निषेध करतो. तसेच निषेध पत्र नगरपालिका प्रशासनास दिल्या जाईल असे सामाजिक कार्यकर्ते  सुनील गायकवाड यांनी सांगितले.
याप्रसंगी के डी वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार नागोराव देशमुख,निर्मला लिपणे सुनील गायकवाड, पि के शिंदे, शुकाचार्य शिंदे, देवेंद्र कुरा,  अबरार बेग , शेख रसुल आदी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page