*पोलीस स्टेशन कोरपना यांची विशेष कामगिरी मौजा मारेगाव जि. यवतमाळ येथून चोरी केलेली क्रेशर मशीन व सराईत गुन्हेगार यांना कोरपना पोलीसांनी ताब्यात घेतले.*
*पोलीस स्टेशन कोरपना यांची विशेष कामगिरी मौजा मारेगाव जि. यवतमाळ येथून चोरी केलेली क्रेशर मशीन व सराईत गुन्हेगार यांना कोरपना पोलीसांनी ताब्यात घेतले.*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दि. 09/07/2026 रोजी सायंकाळी 04/00 वा दरम्यानचे फिर्यादीने स्वतःच्या मालकीची क्रेशर मशिन नादुरुस्त असल्याने दुरुस्ती करिता कोरपना येथील राज वर्कशॉप येथे नेली असता तेथील मालकाने मी माझ्या गावी राजस्थानला जात आहे तुम्ही दुरुस्ती साठी पंधरा दिवसा नंतर घेवुन या असे सांगितले असता फिर्यादीने क्रेशर मशिन घरी न घेवुन जाता राजु वर्कशॉप चे समोर उडाण पुलीया खाली जागा असल्याने ठेवली होती. त्यानंतर फिर्यादीचे शेतीचे काम संपल्यानंतर दिनांक 28/08/2026 रोजी सायंकाळी अंदाजे 05/00 वाजताच्या दरम्यान फिर्यादी क्रेशर मशिन पाहण्यासाठी गेले असता उडान पुला खाली मशिन दिसुन आली नाही. त्यानंतर फिर्यादीने आजुबाजुला विचारपुस केली व आजपर्यंत शोध घेतला असता माझी क्रेशर मशिन मिळून आली नाही. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोस्ट कोरपना अप क्रमांक 312/26 कलम 303(2) बी एन एस गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
तेव्हा सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो नि लता वाढीवे यांच्या आदेशाने पोहवा राकेश वाकुलकर ब. न.969 यांच्याकडे देण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान चोरीस गेलेल्या क्रेशरचा शोध घेणे व क्रेशर चोरी करणाऱ्या इसमाला ताब्यात घेणे आवश्यक होते. तेव्हा गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले क्रेशर मोजा मारेगाव जिल्हा यवतमाळ येथे आहे असे माहिती झाले.
तेव्हा दिनांक 28/09/2026 चे साना क्र. 08/2026 अन्वये पो. हवा. राकेश वाकुलकर/969, सोबत पो.शि.विशाल/1656 हे मौजा मारेगाव जिल्हा यवतमाळ येथे चोरीस गेलेल्या क्रेशर चा शोध घेण्याकरिता रवाना होऊन मालेगाव येथे पोहोचले असता, त्यावेळी चोरीस गेलेल्या क्रेशरचा शोध लागला तेव्हा मौजा मारेगाव येथील जयकिशन फेब्रिकेशन वर्कशॉप येथुन सदर क्रेशर ताब्यात घेतली व ई साक्ष पंचनामा मोबाईलमध्ये चित्रीकरण करून क्रेशर व संशयित आरोपीसह पुढील कार्यवाहीस पो.स्टे. ला परत आले व सदर क्रेशर जप्त करून पो.स्टे. हेडमोहररच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई मा. आयुष नोपानी पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रवींद्र जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस
निरीक्षक लता वाढीवे पो स्टे कोरपना यांच्या नेतृत्वात पोहवा राकेश वाकुलकर ब. न.969 , पोशी विशाल मोरे ब.न. 1656 यांनी केलेली आहे.
पोलीस स्टेशन कोरपना यांचेकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर सातत्याने लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर आहे.