*पोलीस स्टेशन कोरपना यांची विशेष कामगिरी आदिलाबाद येथून चोरी केलेली मो.सा. व सराईत गुन्हेगार कोरपना पोलीसांनी पकडून आदिलाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले.*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या आदेशानुसार पोलीस स्टेशन कोरपना हदीत दिनांक 07/08/2026 रोजी दुपारी 15.00 ते 20.00 वाजेपर्यंत पोलीस कर्मचारी गस्त व नाकाबंदी करीत असताना वणसडी टोल नाक्याजवळ एक इसम संशयास्पदरीत्या वाहन घेऊन येताना आढळून आला.
सदर इसमाने नाकाबंदी पाहून वाहन वळविण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यास थांबविले. चौकशी केली असता त्याने त्याचे नाव मिलिंद जयभारत डनवरे, वय 33 वर्ष, रा. लोणी, ता. कोरपना, जि. चंद्रपूर असे सांगितले.
सदर इसमाकडील वाहन क्रमांक TS-01-ER-0473 बाबत चौकशी केली असता, वाहनाच्या क्रमांकावरून पोलीस स्टेशन आदिलाबाद येथील S.I. अशोक यांच्याशी संपर्क साधला. सदर वाहन आदिलाबाद येथील बस स्टॉपवरून चोरीस गेले असून त्याबाबत गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली.
तसेच संशयित इसमाची ICJS प्रणालीद्वारे माहिती तपासली असता, त्याच्याविरुद्ध मौजा पांढरकवडा, जि. यवतमाळ येथे 02, मौजा राजुरा, जि. चंद्रपूर येथे 02 व मौजा गडचांदूर, जि. चंद्रपूर येथे 01, असे एकूण 05 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
सदर व्यक्ती कोणतेही वैध कामधंदा करीत नसून त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे भविष्यात सार्वजनिक शांतता व नागरिकांच्या मालमत्तेस धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने, त्याच्याविरुद्ध 124 भा. ना. सु. सं. 2023 मधील कलम 35 (ब) अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मोटर सायकल क्रमांक TS.01 ER 0473 ही आदीलबाद पोलीस स्टेशन टाऊन टू येथील पोलिसांचे ताब्यात देण्यात आली.
सदरची कारवाई मा. आयुष नोपानी पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर, ईश्वर कातकडे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर, रवींद्र जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक लता वाढवे पो.स्टे. कोरपना यांच्या नेतृत्वात पोहवा नामदेव पवार ब. नं. 1226 , पोशो लक्ष्मण नुनूंचे ब.नं. 1668 यांनी केलेली आहे.
पोलीस स्टेशन कोरपना यांचेकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर सातत्याने लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर आहे.