Friday, October 9, 2026
spot_img
HomeSanghtana*जंतर-मंतरवर होणार ओबीसी कॉलम साठी 14 डिसेंबर ठिय्या आंदोलन आणि 15 डिसेंबरला...

*जंतर-मंतरवर होणार ओबीसी कॉलम साठी 14 डिसेंबर ठिय्या आंदोलन आणि 15 डिसेंबरला संसदेवर महामोर्चा*

*जंतर-मंतरवर होणार ओबीसी कॉलम साठी 14 डिसेंबर ठिय्या आंदोलन आणि 15 डिसेंबरला संसदेवर महामोर्चा*

*ज्योत्स्ना वानखेडे*: राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बीसी वेल्फेअर  असोसिएशन तेलंगणा आणि आंध्र प्रदेश व देशातील ओबीसी संघटना यांची बैठक कॉन्स्टिट्यूशन क्लब नवी दिल्ली  येथे  बैठक घेण्यातआली या बैठकीला देशभरातून पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने बिहारचे खासदार पप्पू यादव, सीपीएमचे माजी खासदार डी, राजा , हरियाणाचे माजी खासदार राजकुमार सैनी, तेलंगानाचे माजी खासदार वी. हनुमंतराव सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष  डॉ बबनराव तायवाडे, बीसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष जाजुला श्रीनिवास गौड, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर, आंध्रप्रदेश चे अध्यक्ष केसना शंकरराव, छत्तीसगडचे माजी आमदार लेखराम शाहू , महाराष्ट्र आयोगाचे माजी सदस्य इकबाल अन्सारी , ग्यानी झेलसिंग चे नातू पंजाबचे इंद्रजीत सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये कॉन्स्टिट्यूशन क्लब नवी दिल्ली येथे बैठक  घेण्यात आली या बैठकीत  ओबीसी कॉलम साठी  हिवाळी अधिवेशन दरम्यान 14 डिसेंबर जंतर मंतर वर ठिय्या आंदोलन आणि 15 डिसेंबर ला संसदेवर महामोर्चा चे नियोजन बैठकीत करण्यात आले आहे, भारत सरकारने राजपत्राच्या प्रश्नावली मध्ये ओबीसी साठी स्वतंत्र्य कॉलम ची सूची नसल्याने,२०२७ जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान  करण्यात येणार आहे .

जनगणनेत ओपन एंडेड प्रश्न विचारले असुन त्याऐवजी ड्राफ्ट डाउन सूची तयार करून,२०२७ जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करण्यात यावा , केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापित करण्यात यावे, 13 सप्टेंबर 2017 पासून क्रिमिलीअरची मर्यादा वाढली नाही आहे ,ती वाढविण्यात यावी,  महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन व महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे

तरी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे , संतोष गुप्ता , संजय शाहू, शिवप्रसाद शहा, शरद वानखेडे, गुणेश्वर आरिकर, संजय ढवस, प्रकाश भागरथ, सूरज बेलोकर,  शकील पटेल, सतपाल सोखी, रवी  झाडे, मुकेश पुडके, सुभाष फेरम रत्नमाला पिसे, निरुपमा ब्रम्हे,बीसी वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी  विक्रम गौड, शाम कुर्मा, क्रांती कुमार, नागेश्वर राव,मनी मंजिरी आणि ओबीसी संघटनाचे  महाराष्ट्र,तेलंगाना ,आंध्रप्रदेश ,छत्तीसगड पंजाब ,मध्यप्रदेश ,दिल्ली प्रदेश बिहार ,हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यातील ओबीसी बांधव उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page