*घुग्घुस येथे कोळसा वाहतूक करणारा ट्रक जाळल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन आरोपी अटक; चार जणांची नावे निष्पन्न*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
पोलीस स्टेशन घुग्घुस येथे अपराध क्र. २९७/२०२६, कलम ३२६(फ), १२६(२), ३(५) भारतीय न्याय संहिता, २०२३ अन्वये दाखल गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने तपास करून उलगडा केला आहे.
दिनांक २९/०९/२०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या दरम्यान घुग्घुस ओपनकास्ट खदानाजवळ कोळसा वाहतूक करणारा महिंद्रा ट्रक क्र. MH 34 CQ 3385 अज्ञात व्यक्तींनी अडवून पेटवून दिला. या घटनेबाबत ट्रकचालक रमाकांत बाबूलाल सिंह (वय ३५ वर्षे, रा. नकुनी, ता. बेहारी, जि. सहडोल, मध्य प्रदेश) यांनी तक्रार दिल्यानंतर पोलीस स्टेशन घुग्घुस येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला. तपासादरम्यान खुर्शीद उर्फ फरदीन इक्राम शेख (वय २६ वर्षे, रा. शास्त्रीनगर वॉर्ड क्र. १, घुग्घुस) आणि समशेर महेबूब शेख (वय २९ वर्षे, रा. अमराई वॉर्ड, घुग्घुस) यांना अटक करण्यात आली. तपासात इरफान शेख (रा. श्रीराम वॉर्ड, घुग्घुस) आणि अफताब नफीस शेख (रा. अमराई वॉर्ड, घुग्घुस) यांचीही नावे निष्पन्न झाली आहेत.
प्राथमिक तपासात काम व रोजगारासंबंधीच्या नाराजीतून आरोपींनी संगनमत करून ट्रक पेटविण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. आरोपींनी पेट्रोलचा वापर करून ट्रकला आग लावल्याचे तपासात निष्पन्न झाले. घटनेनंतर पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन आग विझविली.
*अटक आरोपी :*
१. खुर्शीद उर्फ फरदीन इक्राम शेख, वय २६ वर्षे, रा. शास्त्रीनगर वॉर्ड क्र. १, घुग्घुस
२. समशेर महेबूब शेख, वय २९ वर्षे, रा. अमराई वॉर्ड, घुग्घुस
अटक आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन घुग्घुस यांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पोलीस स्टेशन घुग्घुस करीत आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक, चंद्रपूर श्री. आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकर, पोलीस हवालदार सतीश अवथरे, इम्रान खान, लालू यादव, संदीप कांबळे, हिरालाल गुप्ता, पोलीस अंमलदार किशोर वाकडे व शशांक बदाम, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर तसेच सायबर पोलीस स्टेशनचे कार्तिक खनके, अनिमेश व गुणवंत यांचा समावेश होता.