Monday, October 12, 2026
spot_img
HomeChandrapurचंद्रपूर लॉयड्स ताडोबा जंगल मॅरेथॉनचा दिमाखात शुभारंभ !

चंद्रपूर लॉयड्स ताडोबा जंगल मॅरेथॉनचा दिमाखात शुभारंभ !

चंद्रपूर  लॉयड्स   ताडोबा जंगल मॅरेथॉनचा दिमाखात शुभारंभ !

लोगो अनावरणासह ३ किलोमीटर जनजागृती मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
राष्ट्रीय स्तरावरील  चंद्रपूर  लॉयड्स  ताडोबा जंगल मॅरेथॉन’ ३ जानेवारी २०२७ रोजी

*Jyotsna Wankhede* :

चंद्रपूरच्या क्रीडा, पर्यटन, पर्यावरण आणि आरोग्य क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्देशाने स्पोर्ट्स सोसायटी ऑफ चंद्रपूरच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘चंद्रपूर ताडोबा जंगल मॅरेथॉन’चा शुभारंभ रविवार, ११ ऑक्टोबर रोजी पोलीस मुख्यालय मैदान, चंद्रपूर येथे उत्साहात झाला. यावेळी मॅरेथॉनच्या लोगोचे अनावरण करण्यात आले तसेच आरोग्य, व्यसनमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या ३ किलोमीटर जनजागृती मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले.

लॉयड्स मेटल व एनर्जी लिमिटेड यांच्या प्रमुख प्रायोजकत्वातून, तसेच चंद्रपूर पोलीस, कॅलिबर आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने ही राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन ३ जानेवारी २०२७ रोजी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या उद्घाटनीय कार्यक्रमाला चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त अकनूरी रमेश, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, लॉयड्स मेटल व एनर्जी लिमिटेडचे प्रमुख  Y G S    प्रसाद आणि  उपाध्यक्ष प्रशांत पुरी,  डॉ. प्रसाद पोटदुखे, विक्रम अरोरा आणि डॉ. रवी आलूरवार डॉ पंकज कावले यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘Run for Health – Run for Nature – Save Water – Run for Tadoba’

‘Say No to Drugs’ या व्यसनमुक्तीच्या संदेशासह ‘Run for Health – Run for Nature – Save Water – Run for Tadoba’ ही व्यापक संकल्पना मॅरेथॉनच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये नियमित व्यायामाची सवय, आरोग्यदायी जीवनशैली, व्यसनमुक्ती, जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

३ किलोमीटर जनजागृती मॅरेथॉनच्या माध्यमातून धावण्याची संस्कृती रुजविण्यासोबतच आरोग्यदायी जीवनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आगामी राष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने धावपटू, युवक, महिला, क्रीडाप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

चंद्रपूरच्या ओळखीला राष्ट्रीय व्यासपीठ

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची समृद्ध वनसंपदा, वाघांचा नैसर्गिक अधिवास आणि जैवविविधता ही चंद्रपूर जिल्ह्याची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. या नैसर्गिक वारशासोबत चंद्रपूरची सांस्कृतिक आणि औद्योगिक ओळख देशभरातील धावपटूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या मॅरेथॉनच्या माध्यमातून केला जाणार आहे.

देशाच्या विविध भागांतून धावपटूंनी चंद्रपूरमध्ये येऊन सहभागी व्हावे आणि चंद्रपूर-ताडोबाची ओळख राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक व्हावी, ही या उपक्रमामागील संकल्पना आहे. मॅरेथॉनमुळे क्रीडा पर्यटन, आरोग्य पर्यटन आणि पर्यावरण पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक युवक, स्वयंसेवी संस्था, क्रीडा संघटना, व्यावसायिक आणि नागरिकांसाठी सहभागाच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

ताडोबाच्या नैसर्गिक सौंदर्याचा आणि जैवविविधतेचा गौरव करताना वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाचा समतोल आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन याबाबत जनजागृती करणे हेही या आयोजनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

आयोजन समितीचे नियोजन आणि प्रयत्न

या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी स्पोर्ट्स सोसायटी ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, सचिव डॉ. प्रजक्ता असवार, कोषाध्यक्ष अनिल टहिल्यानी, उपाध्यक्ष डॉ. कल्पना गुलवाडे आणि डॉ. मनीषा वासाडे, सहसचिव अमित मुत्यालवार, डॉ. रिजवान शिवजी, मकरंद खाडे आणि मोहम्मद काचवाला यांच्यासह संपूर्ण आयोजन समिती प्रयत्नशील आहे.

३ जानेवारी २०२७ रोजी होणारी ‘चंद्रपूर ताडोबा जंगल मॅरेथॉन’ ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून आरोग्य, क्रीडा, व्यसनमुक्ती, जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि पर्यटन विकास यांची सांगड घालणारा चंद्रपूरच्या सर्वांगीण प्रगतीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरणार आहे. या मॅरेथॉनच्या माध्यमातून चंद्रपूरला राष्ट्रीय क्रीडा नकाशावर ठळक स्थान मिळवून देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ मंगेश गुलवाडे संचालन अमित मुत्यालवार तर आभार प्रदर्शन डॉ. प्रजक्ता असवार यांनी केले .

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page