Saturday, October 24, 2026
spot_img
HomeBalapur Talodhi*तळोधी पोलीसांची कामगिरी अपघातानंतर १३ दिवसांनी अज्ञात टिप्पर चालक व वाहन अखेर...

*तळोधी पोलीसांची कामगिरी अपघातानंतर १३ दिवसांनी अज्ञात टिप्पर चालक व वाहन अखेर पोलीसांचे ताब्यात.*

*तळोधी पोलीसांची कामगिरी अपघातानंतर १३ दिवसांनी अज्ञात टिप्पर चालक व वाहन अखेर पोलीसांचे ताब्यात.*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
पोलीस स्टेशन तळोधी येथे फिर्यादी नामे राजेंद्र रुषीजी कोडापे, रा. लखमापूर, ता. नागभीड हे दि. १०/१०/२०२६ रोजी सकाळी ०४/०० वा सुमारास मालक नत्थु श्रीराम चचाने सोबत तळोधीवरून बैलांना चारा आणण्यासाठी जात असताना अंदाजे ०४/४५ वा ते ०५/०० वा दरम्यान गोमाजी दामाजी पेट्रोलपंप जवळ हायवे रोडवर नागभीडकडून विरुद्ध दिशेने येणारी एक टिप्पर भरधाव वेगाने, हयगयीने व निष्काळजीपणे चालवून टिप्पर चालकाने बैलबंडीला धडक दिल्याने नथ्यु चचाने याचे पायाला गंभीर दुखापत केली तसेच अपघातात बैल जखमी होवून मरण पावला. टिप्पर चालकाने धडक देवून घटनास्थळावरून पळून गेल्याने फिर्यादीचे रिपोर्टवरून पोलीस स्टेशन तळोधी येथे अपराध क्र. २६२/२०२६ कलम १२५ (अ), २८१ भा. न्या. स. सहकलम १८४, १३४ मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. अपघातात जखमी नत्थु श्रीराम चचाने वय ५५ वर्ष रा. तळोधी याचा उपचारदरम्यान मृत्यु झालेला आहे.
गुन्ह्याचे तपासात वाहनाचा तांत्रिकदृष्ट्या शोध घेतांना संभ्रम निर्माण होत असल्याने तळोधी पोलीसांनी आपले तपासाचे कौशल्य पणाला लावुन तळोधी रोडने चालणारे अवजड वाहन कोणाचे व कोठून येतात याबाबत गुप्त बातमीदाराकडून विना क्रमांकाचे टिप्परचा शोध घेतला. तसेच तपासात उमरेड जि. नागपूर येथे असताना सदरचे वाहन भिवापूर रोडने मुलकडे जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने तिचा पाठलाग करून तसेच पो स्टे वाहतुक कर्मचारी यांना माहिती देवुन तळोधी रोडवर नाकाबंदी केली असता टिप्पर क्रमांक *MH 40 CD 4632* चालक नामे सचिन दुर्योधन देशमुख, वय ३७ वर्ष, धंदा चालक, रा. सोमानळा, पोस्ट मोकेबंर्डी ता. भिवापूर जि. नागपूर याचे ताब्यात मिळून आल्याने त्यास विचारपूस दरम्यान गुन्हा केल्याचे कबुल केल्याने आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. टिप्पर क्रमांक *MH 40 CD 4632* हि पो स्टे ला डिटेन करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. आयुष नोपानी  चंद्रपूर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे  चंद्रपूर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी साहिल झरकर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सपोनी राहुल गुहे, पोउपनि राजेश उंदिरवाडे, पो हवा स्वप्नील चांदेकर/२५७३, पो अ. संदेश देवगडे/२३३२, विजय मैद/१६३, अक्षय हटवार/१८५ यांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page