*जनता विद्यालय सिटी ब्रँच, बल्लारपूरच्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय लाठी स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदक*
*कलकत्ता येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
जनता विद्यालय सिटी ब्रँच, बल्लारपूरच्या विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडा कौशल्याच्या जोरावर राज्यस्तरावर शाळेचे आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
*’४ थ्या महाराष्ट्र स्टेट ट्रॅडिशनल लाठी स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२६’*
या राज्यस्तरीय लाठी स्पर्धेत शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची लयलूट केली.
या स्पर्धेत शाळेतील इयत्ता ७ वी मध्ये शिकणारा *अभय महेश निषाद* याने *सुवर्णपदक* पटकावले, तर इयत्ता ८ वी मधील *पियुष क्रिष्णा मेश्राम* याने *रौप्यपदक* मिळवून विद्यालयाचा नावलौकिक वाढवला.
या राज्यस्तरीय यशानंतर आता या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांची कलकत्ता येथे आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय लाठी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यावेळी मुख्याध्यापिका *आर. ए. गंधारे,* उपमुख्याध्यापिका *पी. जे. गंगमवार* आणि पाळी प्रमुख *डॉ. पी. डब्ल्यू. मत्ते* यांनी विजेत्या खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच क्रीडा प्रमुख *एम. एल. पानघाटे* व *डी. एल. कुबडे* यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले असून, त्यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
*राष्ट्रीय स्तरावरही हे विद्यार्थी सुवर्ण कामगिरी करतील, असा विश्वास शाळेने व्यक्त केला आहे.*