Sunday, April 26, 2026
HomeChandrapurपर्यावरण विषयक जनसुनावणी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करा:- राजेश बेले
spot_img

पर्यावरण विषयक जनसुनावणी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करा:- राजेश बेले

पर्यावरण विषयक जनसुनावणी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करा:- राजेश वारलुजी बेले संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था चंद्रपूर

श्रेयश वानखेडे:

में. अंबुजा सिमेंट लि. मराठा लाईनस्टोन माईन लखमापूर ता. कोरपना जि. चंद्रपूर पर्यावरण विषयक जाहिर जनसुनावणी दि. ०३/०२/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. झालेल्या पर्यावरण विषयी जनसुनावणी कायद्याचे उल्लंघन करून पर्यावरण विषयक जनसुनावणीचे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री. डी. एस. कुंभार व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांनी केला असल्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश  बेले यांनी केली आहे.

मे. अंबुजा सिमेंट लि. मराठा लाईनस्टोन माईन यांनी बाखंडी, उपरवाही, चांदूर, पिंपळगाव, लखमापूर आणि धुत्रा (ता. कोरपना) आणि सोनपूर (ता.राजूरा), जि. चंद्रपूर या गावामध्ये मराठा लाईनस्टोन माईन-II, (ML क्षेत्र-८८०.३१ हेक्टर) मधील विद्यमान १२०० ची यांच्यासह लाइनस्टोन प्रॉडक्शन कपॅसिटी (चुनखडी उत्पादन क्षमता) २.० दशलक्ष TPA विस्तार, पृष्टभागावरची माती ०.२५ दशलक्ष, कचरा/अपव्यय (ओबी/आयबी) २.४० दशलक्ष TPA, सबग्रेड ०.५० दशलक्ष TPA (एकूण खोदकाम ६.६५ दशलक्ष TPA), विस्तारी प्रकल्पाच्या प्रस्तावाबाबत पर्यावरण विषयक जनसुनावणी घेण्यात आली.

पर्यावरणविषयी जनसुनावणी दिनांक ०३/०२/२०२५ रोजी सकाळी ११. ०० वा. सुरू करण्यात आली त्या सभेमध्ये पर्यावरण प्रेमी, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण तज्ञ व गावातील नागरिक इ. उपस्थित असतेवेळी अनेक पर्यावरणविषयी आप-आपली मते मांडण्यात आली. त्या दरम्यान अंबुजा सिमेंट कंपनीकडून अंबुजा फाऊडेशनच्या माध्यमातुन चालविण्यात आलेल्या महिला बचत गटाच्या महिला कार्यकत्यांनी यावेळी मोठया संख्येनी आपली उपस्थिती दर्शविली व अंबुजा सिमेंट कंपनीचे गुण गायने चालू केले. ही बचत गटाची सभा नसून ही पर्यावरणविषयक जनसुनावणी असतेवेळी दिशाभूल करण्याचे षडयंत्र अंबुजा फाऊडेंशन यांनी व पर्यावरणविषयक जनसुनावणीचे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हाधिकारी, चंद्रपूर श्री. डी. एस. कुंभार, म.प्र.नि.मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक अधिकारी, श्री. तानाजी यादव व उपप्रादेशिक अधिकारी, श्री. उमाशंकर भादुले व उपविभागीय अधिकारी, श्री. रविंद्रकुमार माने यांनी पर्यावरण तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व गावातील नागरिकांना बोलण्यास मनाई केली व में. अंबुजा सिमेंट लि. मराठा लाईनस्टोन माईन लखमापूर, ता. कोरपना, जि. चंद्रपूर यांची पाठराखन करून प्रकल्पाचा एकतर्फा निर्णय घेऊन पर्यावरणविषयक जनसुनावणी आटोपती घेण्यात आली या प्रकारे पर्यावरणविषयक जनसुनावणी कायद्याचे उल्लंघन झालेले आहे.

पर्यावरणविषयक जनसुनावणीचे अध्यक्ष, अतिरिक्त जिल्हाधिकारी, चंद्रपूर श्री. डी.एस.कुंभार, म.प्र.नि.मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक अधिकारी, श्री. तानाजी यादव व उपप्रादेशिक अधिकारी, श्री. उमाशंकर भादुले व उपविभागीय अधिकारी, श्री. रविंद्रकुमार माने यांनी संपूर्ण शासकीय अधिका-यांनी जनतेच्या, पर्यावरण तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, संपूर्ण गावातील नागरिक व पर्यावरण सामाजिक संस्था यांच्यावरती दबाव टाकून पर्यावरणविषयक जनसुनावणी तात्काळ आटोपती घेण्यात आली. अशा प्रकारे या शासकीय अधिका-यांनी पर्यावरणविषयक जनसुनावणीच्या कायद्यांचे उल्लंघन केल्याचे संपूर्ण पुरावे पर्यावरणविषयक जनसुनावणी दरम्यान घेण्यात आलेली व्हिडीओ रिकॉडिंगमध्ये नोंद झालेली आहे. हे शासकीय अधिकारी जनतेचे सेवक असतेवेळी हे पर्यावरणविषयक जनसुनावणी दरम्यान प्रकल्पधारक में. अंबुजा सिमेंट लि. मराठा लाईनस्टोन यांचे सेवक बनलेले निर्देशनात आलेले आहे. त्यामुळे यांच्यावरती संबंधी कायदयाअंतर्गत चौकशी व योग्य ती कारवाई  करण्यात यावी अशी मागणी पंतप्रधान मान. श्री नरेंद्र मोदी, प्रधान सचिव पर्याय मंत्रालय व वातावरण बदल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई सदस्य सचिव व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना करण्यात आली व घेण्यात आलेल्या पर्यावरणविषयक जनसुनावणी रद्द करून सर्वांना न्याय देण्यात यावी अशी मागणी राजेश बेले संस्थापक अध्यक्ष संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्था यांनी केली आहे.

प्रतिलीपी १. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर, २. सदस्य, सचिव महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई (महाराष्ट्र राज्य), ३. प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर यांना देण्यात आल्या.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page