Sunday, May 31, 2026
HomeSanghtanaसंपूर्ण व्यवस्था बदलण्यासाठी बामसेफ सक्षम: कविता मडावी.
spot_img

संपूर्ण व्यवस्था बदलण्यासाठी बामसेफ सक्षम: कविता मडावी.

संपूर्ण व्यवस्था बदलण्यासाठी बामसेफ सक्षम: कविता मडावी.

श्रेयश वानखेडे: 
   देशातील सामाजिक व्यवस्था विविध राजकीय पक्षांच्या सत्ता असल्या तरीही मूलनिवासी समाजाचे शोषण व पुंजिवादी व्यवस्था कायम आहे. कारण भारतीय संविधानाचे मुल्य अवहेरून केंद्रीय व्यवस्था कायम करण्यात आल्याने मूलनिवासी समाजाला परिणाम भोगावे लागत आहेत. ती व्यवस्था बदलण्यासाठी बामसेफ सक्षम असल्याचे मत मा.कविता मडावी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बामसेफ यांनी प्रशिक्षण शिबीरात मार्गदर्शन करताना व्यक्त केले. देशातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांवर बामसेफ चा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसुन येत आहे.
    स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले (हिंदी/उर्दू/तेलुगू) विद्यालय, डॉ.झाकीर हुसैन वार्ड बल्लारपूर येथे दि.16/2/25 ला एकदिवसीय कॅडर कॅंप संपन्न झाला. संचालन महासचिव मा.दिवाकर मडावी यांनी केले तर मा.पंकज जांगडेकर, राज्य कार्यकारिणी सदस्य,मा.वनिता सुटे-भसारकर उपाध्यक्षा, मंचावर उपस्थित होते. मा.सहारे, पॅवर विंग्ज यांनी ही प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली.
  प्रशिक्षण शिबीरात 22 जनांचा सहभाग होता. त्यात 15 सदस्य नोंदणी करण्यात आली. सेवकदास बरके, मक्कम चे मोतीराम करमनकर, मूलनिवासी संघाचे एम.टी.साव सर, जि.के.उपरे साहेब, अनुपमा संजय मेश्राम, डी.एन. झामरे, प्रभुदास देवगडे, वसंत कांबळे, वसंत वानखेडे,विशाल भसारकर व अन्य लोकांनी सहयोग दिला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page