Thursday, June 4, 2026
HomeSanghtanaओबीसी (विजा,भज व विमाप्र) समाजाच्या मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्यभर धरणे...
spot_img

ओबीसी (विजा,भज व विमाप्र) समाजाच्या मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्यभर धरणे आंदोलन

ओबीसी (विजा,भज व  विमाप्र) समाजाच्या मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्यभर धरणे आंदोलन

श्रेयश वानखेडे:

ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे चंद्रपूर 11 सप्टेंबर 2023 ला अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते तेव्हा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री , ओबीसी मंत्री, प्रधान सचिव यांच्या उपस्थितीत दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई सह्याद्री सभागृह येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ पदाधिकाऱ्यांसोबत संपन्न झालेल्या बैठक झाल्यावर 30 सप्टेंबर 2023 ला त्या वेळचे उपमुख्यमंत्री आजचेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबिसीच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मार्गे लावण्यात येईल असे लिखित आश्वासन चंद्रपुरात येऊन रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सोडते वेळी दिले होते, परंतु त्यापैकी काही मागण्या अजूनही प्रलंबित आहेत त्यात बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा,ओबिसी , व्हीजे,एनटी & विमाप्र विद्यार्थ्याना अजूनही आधार योजनेतील रक्कम मिळाली नाही ,जिल्हा मध्यवर्ती बँकेतील मागासवर्गीयाचे आरक्षण लागू करण्यात यावे,सारथी व बार्टी प्रमाणे दि.23 सप्टेंबर 2024 च्या मंत्री मंडळ निर्णयाप्रमाणे महाज्योती अंतर्गत नोंदणी असणाऱ्या ओबीसी, भटके विमुक्त व एस.बी.सी विद्यार्थी यांना २ वर्षांपासून प्रलंबित असणारी फेलोशिप तात्काळ अदा करावी. ओबीसी, विजा, भज व विमाप्र सुशिक्षित बेरोजगारा व्याज परतावा कर्ज मर्यादा 15 लक्ष करण्यात यावी, ओबीसी मुलांना भारत सरकार स्कॉलरशिप 100%करण्यात यावी, अनुसूचित क्षेत्रात महामहीम राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार वर्ग 3 व वर्ग 4 चे 17 संवर्गीय पदे भरताना शंभर टक्के अनुसूचित जमातीतूनच भरली जातात त्यामुळे ओबीसी सहित इतर होणारा अन्याय तात्काळ थांबविण्यात यावा. ओबीसी, विजा,भज व विमाप्र समाजातील पाल्यांना सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणारे सर्व सफाई कामगांराना लाड समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने वारसा हक्काने नियुक्ती देण्यात यावी , केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी साठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा 15 लक्ष रुपये करण्यात यावी, आरक्षणाची 50% मर्यादा रद्द करण्यात यावी ,ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा इत्यादी प्रलंबित मागण्या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी 2025 ला जिल्हाधिकारी कार्यालय समोर दुपारी 12 ते 3 वाजे पर्यंत चंद्रपूर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे .राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य सर्व जातीय संघटना , आणि समविचारी संघटना यांनी उपस्थीत रहावे असे आवाहन राष्ट्रीय महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी केले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page