जनता विद्यालय ताडाळी येथे मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
श्रेयश वानखेडे:
दि: 27- 2- 2025 व दि:28- 2 -2025 ला जनता विद्यालय ताडाळी येथे मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध भाषणे व प्रयोग सादर केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक श्री बी. जी. जिवतोडे सर यांनी मुलांना मराठी भाषेबद्दल व विज्ञानाबद्दल माहिती दिली.तसेच कवी कुसुमाग्रज, प्रसिद्ध शास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांचे जीवन चरित्र समजावून सांगितले.त्याचप्रमाणे विज्ञान शिक्षिका श्रीमती भगत मॅडम, उमरे मॅडम, व जोगी सर यांनी मुलांना विज्ञानाबद्दल विविध माहिती दिली.प्रयोग समजावून सांगितले.कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी होते.