Friday, June 19, 2026
HomeFestivalsश्रीराम मंदिरात सुवर्ण जयंती उत्सव साजरा
spot_img

श्रीराम मंदिरात सुवर्ण जयंती उत्सव साजरा

श्रीराम मंदिरात सुवर्ण जयंती उत्सव साजरा

श्रेयश वानखेडे:
बल्लारपूर येथील गांधी चौकातील श्रीराम मंदिराला 50 वर्ष पूर्ण झाले. सन 1975 मध्ये श्रीराम मंदिर ट्रस्ट ची स्थापना करण्यात आली. त्यात प्रामुख्याने स्वामी वेदांती रामानुजनचार्यजी, अखेरामजी सोमानी, लच्छीरामजी सोमानी,
रामकृपालजी गुप्ता, द्वारकाप्रसादजी गुप्ता, लादूलालजी काबरा, मोतीलालजी मालू,  मोतीलालजी काबरा, बिंदाप्रसादजी गुप्ता, कल्याणमलजी खंडेलवाल, गोवर्धनदासजी काबरा यांचा समावेश होता. त्यांनी जी नियमावली घालून दिलेली होती, त्यानुसारच कामकाज आता सुद्धा चालू आहे. त्यानिमित्ताने मंदिरात सुवर्ण जयंती उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. दिनांक 9 आणि 10 तारखेला दोन दिवसीय उत्सवात प्रवचन, कलश यात्रा, हवन, अभिषेक भजन आदी कार्यक्रम घेण्यात आले.
10 तारखेला महाप्रसादचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी भक्तगणाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अशी माहिती मान. रामधनजी सोमानी, मान. रामनारायणजी खंडेलवाल, मान. नारायणदासजी काबरा यांनी दिली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page