खरीप हंगामासाठी दर्जेदार खते, बियाणे व औषधी पुरेसा पुरवठा करण्यात यावा.
सेलू तालुका दबाव गटाची पालक मंत्र्यांकडे मागणी.
श्रेयश वानखेडे:
खरीपाचा हंगाम तोंडावर आहे. मागील काही वर्षे परभणी जिल्हा सह मराठवाडा मध्ये अप्रमाणित खते औषधे आणि यांची सर्रास विक्री झाली. तसेच कापुस काही बियाणे व डिएपी, युरिया ई चा राजरोसपणे कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला. त्यामुळे आधीच शेतमालाला योग्य भाव नाही व त्यावर पुन्हा चढ्या भावाने बियाणे, खते खरेदी यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत परेशान झाला होता. जिल्हा सह सर्व मराठवाडा मध्ये हीच परिस्थिती होती. जिल्ह्यातील कृषी खात्यांचे व्यापारी वर्गावर कसल्याच प्रकारचे नियंत्रण नव्हते. नियमित याबाबत आढावा घेतला जात नव्हता. त्या मुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने खते, बियाणे मिळेल त्या चढ्या भावात ऐन पेरणीच्या वेळेस खरेदी करावा लागला. या वर्षी त्यामुळे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. व्यापारी व कृषी विभागा च्या अधिकाऱ्यांनी हे सर्व काही करून हात वर केले.मोठ्या प्रमाणात काळाबाजार कडे दुर्लक्ष करण्यात आले. यावर्षी देखील हीच अवस्था निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही कृषी विभागाच्या वतीने तपासणी पथक स्थापन होणे आवश्यक आहे. तसेच या बाबतीत जे कोणी जर खरीपाच्या हंगामात बियाणे, खते औषधे ई बाबत जर शेतकऱ्यांची अडव णूक करतील चढ्या भावाने विक्री करतील तर संबंधित विभागातील अधिकारी व व्यापारी यांचेवर तात्काळ कारवाई केली पाहिजे.
या संबंधीची सक्त आदेश संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतिने मा. ना. मेधना बोर्डीकर पालक मंत्री परभणी जिल्हा यांचेकडे करण्यात आली असून त्या अशायाचे निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदनावर श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, इसाक पटेल, गुलाब पौळ, मुकुंद टेकाळे, देवराव दळवे, दिलीप मगर, नारायण पवार, लिंबाजी कलाल, योगेश सुर्यवंशी, उमेश काष्टे, सतिश काकडे, सुभाष काकडे, आबासाहेब भुजबळ, लक्ष्मण रामचंद्र कांबळे,भारत रवंदळे, दताराव कांगणे, रौफ भाई, सय्यद जलाल, अजित मंडलिक, सुधीर आधाव, राजेंद्र केवारे, रामचंद्र आधाव, उध्दव सोळंके, गणेश सोळंके, रामेश्वर शेवाळे, दिलीप शेवाळे, भाऊ साहेब सोनवणे ई सह्या आहेत.