लिगामेंट शस्त्रक्रियेसाठी “भारत केसरी”ने गाठले दिल्लीवरून थेट जळगाव !
यशस्वी उपचार मिळाल्याबद्दल गुजर परिवाराने मानले डॉक्टरांचे आभार
श्रेयश वानखेडे:
शहरातील नॉर्दन जॉईन रिप्लेसमेंट सेंटर येथे दिल्ली येथील ‘भारत केसरी’ पुरस्कारप्राप्त कुस्तीपटू संजय गुजर याच्या दोन्ही पायाच्या लिगामेंट शस्त्रक्रिया नुकत्याच उत्कृष्टरित्या पार पडल्या आहेत. याबद्दल गुजर परिवाराने रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले आहेत. संजय गुजर हा उत्तम कुस्तीपटू असून त्याने भारत केसरीचा खिताब देखील मिळवला आहे. अनेक स्पर्धेमध्ये सहभागी होऊन गुजर यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाची चुणूक दाखवली आहे. गेल्या काही दिवसांपासून पायांच्या गुडघ्यांच्या दुखण्याने त्रस्त केले होते.अनेक दवाखान्यांमध्ये दाखवले. मात्र दिलासा मिळत नव्हता.अखेर जळगाव येथील नॉर्दन जॉईन रिप्लेसमेंट सेंटर येथील होणाऱ्या शस्त्रक्रियेंबाबत त्याला माहिती मिळाली. तेव्हा गुजर यांनी दिल्लीवरून थेट जळगाव गाठत नॉर्दन जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर येथे दाखल झाला. या ठिकाणी दोन्ही पायांच्या लिगामेंटची सर्जरी कुस्तीपटू संजय गुजर याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. चौधरी व सेंटरमधील कर्मचाऱ्यांचे आभार मानले.