Monday, May 4, 2026
HomeParbhaniक्युरियस किड्समध्ये फिनलंड तज्ज्ञांकडून शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम.
spot_img

क्युरियस किड्समध्ये फिनलंड तज्ज्ञांकडून शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम.

क्युरियस किड्समध्ये फिनलंड तज्ज्ञांकडून शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम.

श्रेयश वानखेडे: दि. 3 जुलै 2025 रोजी सॅनरो एज्युकेअर प्रा. लि. संचलित क्युरियस किड्स येथे फिनलंडच्या शैक्षणिक तज्ज्ञां कडून शिक्षकांसाठी एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम सॅनरो नॉलेज सिटी कॅम्पस, सेलू येथील क्युरियस किड्स सभागृहात पार पडला. सॅनरो एज्युकेअर प्रा. लि.चे चेअरमन डॉ. संजय रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या एकदिवसीय प्रशिक्षणात फिनलंडच्या अभ्यासक्रम (Finnish Curriculum), शिक्षण क्षेत्रे (Learning Areas), आणि शिक्षण वातावरण (Learning Environment) यांसह फिनलंडच्या शैक्षणिक पद्धतीबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. फिनलंडच्या नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धतींचा अवलंब करून शिक्षकांना त्यांच्या अध्यापन पद्धतीत सुधारणा करण्यासाठी प्रेरणा देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.हा प्रशिक्षण कार्यक्रम क्युरियस किड्स सभागृह, सॅनरो नॉलेज सिटी कॅम्पस, सेलू येथे दुपारी आयोजित करण्यात आला होता. प्रशिक्षणाची वेळ 2 ते 3 तास होती, ज्यामध्ये परस्परसंवादी सत्रे आणि चर्चांचा समावेश होता.या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना फिनलंडच्या शिक्षण पद्धतीतील सर्वोत्तम पद्धती (Best Practices) समजून घेण्याची आणि त्या स्थानिक स्तरावर लागू करण्याची संधी मिळाली. क्युरियस किड्सच्या या उपक्रमामुळे शिक्षकांमध्ये नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करण्याची प्रेरणा निर्माण झाली असून, याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सकारात्मक परिणाम होईल, असे डॉ संजय रोडगे यांनी नमूद केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page