छत्र. शाहू महाराज रयतेच्या सुख दु:खात सहभागी होणारा राजा
श्रेयश वानखेडे: स्वत: व्यवस्थेकडून झालेला अपमान व कागल संस्थान च्या रयतेची स्थिती लक्षात घेऊन त्यांनी रयतेसाठी मूलभूत सोई व सन्मानाने जगण्याची साधने निर्माण केलीत व ब्राह्मणवादी व्यवस्थेकडून लोकांना मुक्त करण्यात एक सत्यशोधक म्हणून आपली भुमिका पार पाडल्याचे मत मा. वनिता आसुटकर, माजी जिल्हाध्यक्षा, संभाजी ब्रिगेड, चंद्रपूर यांनी व्यक्त केले.त्या पीपीआय-डे ने केलेल्या गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होत्या.
कागल संस्थान, मानगांव परिषद डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्षते खाली 1920 मध्ये संपन्न झाली होती. सभेत विविध ठरावा मध्ये दुसरा ठराव छत्र. शाहू महाराज यांची जयंती सनासारखी उत्साहात करण्यात यावी असा आहे. छत्र. शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यां करिता शाळा, होस्टेल इ.ची शैक्षणिक व्यवस्था केली होती. त्यांच्या राज्यात विविध प्रोत्साहन पर सत्कार देखिल होत.
“पीपल्स पार्टी ऑफ इंडिया-डेमोक्रटीक” ने दि.6/7/25 ला श्रमिक पत्रकार भवन वरोरा नाका चंद्रपूर येथे छत्र. शाहू महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार मा.हरिश सहारे, राष्ट्रीय विभागीय सचिव PPI-D यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाला. याप्रसंगी अथिती म्हणून मा.जि.के. ऊपरे, राज्य उपाध्यक्ष, PPI-D,मा.संदीप रामटेके,राज्य महासचिव,PPI-D,मा.मोतीराम करमनकर, राज्य कार्यकारिणी सदस्य,MKKM,मा.संदीप वाघमारे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य,पिपल्स युथ फ्रंट,युवा विंग्ज PPI-D इ.नी आपले विचार व्यक्त केले. अतिथींच्या हस्ते स्व.बाबुराव वानखेडे विद्यालय, चंद्रपूर:-
1.रिया मोहन तरारे,
2.मैथिली राकेश नरेड्डीवार,
3.युनिक रमेश टेंभरे.
मातोश्री हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, चंद्रपूर:-
1.संचिता जितेंद्र बनकर,
2.योगेश रामकिशन इटनकर,
3.मनस्वी संजय चिंचोलकर,
4.कुणाल दिपक गौरकार.
चंद्रपूर पब्लिक स्कूल:-
आराधना प्रविण झोडापे इ.चा पालकांसह सत्कार स्मृती चिन्ह, गुच्छ देऊन करण्यात आला.पुरस्काराचे प्रयोजक मा.जि.के. ऊपरे,राज्य उपाध्यक्ष PPI-D,यांचेकडून प्रयोजीत केले.तर कार्यक्रमाचे प्रायोजक मा.एम.टी.साव सर,यांनी त्यांच्या (25/6) 75व.व्या वाढदिवसा निमित्त प्रयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.महेंद्र खंडाळे जिल्हाध्यक्ष PPI-D यांनी केले.
संचलन मा.नभा वाघमारे,राज्य महासचिव पिपल्स युथ फ्रंट राज्ययुवा विंग्ज PPI-D यांनी केले.तर आभार मा.सेवक बरके, राज्य कार्यकारिणी सदस्य मूलनिवासी संघ यांनी मानले.