Sunday, April 19, 2026
HomeEducationशालेय मैदानी स्पर्धेत केजीएन शाळेचे विद्यार्थ्यांचे जिल्हा स्तरावर चयन.एकूण 16 पदके जिंकून...
spot_img

शालेय मैदानी स्पर्धेत केजीएन शाळेचे विद्यार्थ्यांचे जिल्हा स्तरावर चयन.एकूण 16 पदके जिंकून शाळेचे नावलौकिक वाढवले.

शालेय मैदानी स्पर्धेत केजीएन शाळेचे विद्यार्थ्यांचे जिल्हा स्तरावर चयन.एकूण 16 पदके जिंकून शाळेचे नावलौकिक वाढवले.

Jyotsna Wankhede:
युवा व क्रीडा संचालनालय महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी द्वारे बल्लारपूर तालुका स्टेडियम विसापूर येथे मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत केजीएन पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ,बल्लारपूरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत विविध खेळांमध्ये एकूण सोळा पदकाची कमाई केली.
19 वर्षाखालील मुलांचे गटा मध्ये मुरसलिन आलम हिने थाली फेक ,लॉंग जंप व भालाफेक या तिन्ही खेळांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. सुजित प्रसाद याने 5000 मीटर तथा तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत अनुक्रमे प्रथम व द्वित्य क्रमांक, साद समीर सय्यद याने 200 मीटर धावणे यात द्वित्य क्रमांक, कृष्णा मांची याने उंच उडी या खेळात प्रथम क्रमांक पटकावला.
17 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये आयुष माझी  3000 मीटर धावणे प्रथम क्रमांक तसेच वन्श झिलकलवार उंच उडी प्रथम क्रमांक, मिराज खान उंच उडी दुसरा क्रमांक.
14 वर्षाखालील मुलांच्या गटांमध्ये आर्यन तिवारी याने उंच उडी खेडा मध्ये प्रथम क्रमांक
14 वर्षाखालील मुलींच्या गटांमध्ये उंच उडी या खेळामध्ये समता पेनदौर हिने प्रथम व देवयानी पिंपळकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक शेख मेहमूद, प्रिन्सिपल स्वाती वाघमारे, वाईस प्रिन्सिपल सीमा माकडे, श्वेता डोनेवार, आदींनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले .
विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये शाळेचे क्रीडा शिक्षक रमेश नातरगी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page