Jyotsna Wankhede:
चांदा इको केअर फाउंडेशन चंद्रपूर तर्फे पर्यावरण पूरक देखावा व सामाजिक दायित्व जपणाऱ्या गणेश मंडळांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आझाद बगीचा चंद्रपूर येथे नैसर्गिक वातावरणात संपन्न झाला.
चंlदा ईको केअर फाउंडेशन तर्फे सार्वजनिक गणेश मंडळाचे परीक्षण करून ज्या मंडळांनी पर्यावरण पूरक देखावा चे सादरीकरण केले तथा सामाजिक दायित्वाचे कार्य केले अशा मंडळांची निवड करून त्यांना पुरस्कृत करण्यात आले.
मंचावर योग नृत्य परिवाराचे संस्थापक अध्यक्ष गोपालजी मुंदडा, प्रमुख अतिथी पर्यावरण प्रेमी डॉक्टर बालमुकुंद पालीवाल, योग नृत्य परिवाराच्या महिला प्रमुख किशोरी विरुडकर ,चांदा ईको केअर फाउंडेशन चे अध्यक्ष विवेक आंबेकर, सचिव पद्माकर मोरे, कोषाध्यक्ष प्रमोद केळझरकर उपस्थित होते.
प्रथम पारितोषिक श्री नवयुवक बाल गणेश मंडळ दत्तनगर चंद्रपूर, द्वितीय पारितोषिक सार्वजनिक गणेश मंडळ जगन्नाथ बाबा नगर चंद्रपूर, तथा प्रोत्साहन पर पारितोषिक हिवरपुरी बालगणेश मंडळ चंद्रपूर यांना देण्यात आले.
विजेत्या गणेश मंडळांचे प्रमुख अतिथीच्या हस्ते ट्रॉफी देऊन स्वागत करण्यात आले.
इको केअर फाउंडेशन तर्फे याप्रसंगी पर्यावरण प्रेमी डॉक्टर बालमुकुंद पालीवाल व योग नृत्य परिवाराचे संस्थापक अध्यक्ष गोपालजी मुंदडा यांचा त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन इको फाउंडेशनचे उपाध्यक्ष अशोक दुर्गे तर आभार प्रदर्शन अतुल अल्याडवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल देवतळे, नितीन फुलझले, आनंद निरंजने ,प्रदीप देवईकर, संजय रांगणकर, अविनाश रेशीमवाले, प्रशांत निंबाळकर व योग नृत्य परिवाराचे सदस्यांनी सहकार्य केले.