श्री साईबाबा सेवा संस्थान बल्लारपूर तर्फे एक दिवसीय दर्शनीय सहल
ज्योत्स्ना वानखेडे :
श्री साईबाबा सेवा संस्थान बालाजी वॉर्ड बल्लारपूर येथून दि.29 जानेवारी सकाळी 7 वा.येथून श्री जगन्नाथ बाबा देवस्थान भांडे वाडा, वानोजा देवी तसेच भोजाजी महाराज देवस्थान अजाणसारा येथे सहा ट्रॅव्हल्स एकूण 305 भाविकांना नेण्यात आले. अल्पशा दरात फक्त तिकिटाचे पैसे घेऊन श्री पांडुरंग जरीले यांनी जेवणाची स्वतः कडून व्यवस्था केली. बामणी येथून 100 भाविक, जुनी दहेली येथून 85 विसापूर येथून 27,तसेच बल्लारपूर येथून 113 असे एकुण 305 भाविकांना दर्शन घडविले. भोजाजी देवस्थान आजनसारा येथे पुरण पोळी चे जेवण करून आस्वाद घेतला. दिवसभर भाविकांनी नाचत गाजत खूपच आनंद लुटला. यशस्वी ते साठी साई सेवा संस्थानचे अध्यक्ष श्री पांडुरंग जरीले,श्री तुळशीराम महाकाळकर, बामणी चे समाज सेवक सूर्यभान मालेकर, सहदेव डेरकर,जुनी दहेली चे चंदू वाढई ,वस्ती विभागाचे सौ. माया मडावी, विसापूर च्या सौ. गीता धोटे व ईतर लोकांनी अथक परिश्रम घेतले.
अजाणसरा येथे संस्थान कडून श्री प्रशांत वैध यांनी श्री पांडुरंग जरीले, तुळशीराम महाकाळकर व दरणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.