Sunday, May 31, 2026
HomeHealth & Fitnessमोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे इनर व्हिल...
spot_img

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे इनर व्हिल क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूर व रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर व्हॅक्सिनेशन शिबिराचे आयोजन

मोहसीनभाई जव्हेरी कन्या  विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे इनर व्हिल क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूर व रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर व्हॅक्सिनेशन शिबिराचे आयोजन

ज्योत्स्ना वानखेडे:

मोहसीनभाई जव्हेरी कन्या  विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे इनर व्हिल क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूर व रोटरी क्लब स्मार्ट सिटी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर व्हॅक्सिनेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराकरिता शाळेच्या प्राचार्या असमा खान मॅडम तसेच डॉ.विद्या बांगडे,  डॉ. सोनम कपूर, डॉ. चंदा खांडरे, डॉ. स्वप्ना गौथारे, डॉ. कोमल निखारे सह उपस्थित होते. डॉ. सोनम कपूर यांनी विद्यार्थ्यांना समुपदेशन सत्रामध्ये विद्यार्थिनींच्या मनातील शंका-कुशंका दूर करण्यात आल्या. कॅन्सर लसीकरणाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून वैज्ञानिक माहितीच्या आधारे जागरूकता निर्माण करण्यात आली. तसेच कॅन्सर लस विषयी विद्यार्थिनींना व त्यांच्या पालकांना समजावण्यात आले. शाळेच्या प्राचार्या असमा खान मॅडम यांनी योग्य वयात लसीकरण केल्यास भविष्यात गंभीर आजारांपासून संरक्षण मिळू शकते, याबाबत विद्यार्थिनींना  समजावण्यात आले. कॅन्सर लस ही  वय 9 वर्ष ते 14 वर्ष या वयोगटातील  40 विद्यार्थिनींना  देण्यात आलेली आहे. लसीकरणापूर्वी सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती घेण्यात आली होती. संपूर्ण प्रक्रिया वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. सर्व विद्यार्थ्यांनी शिबिरास योग्य प्रतिसाद दिला.तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिबिरास मोलाचे सहकार्य केले. या आरोग्यदायी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page