Thursday, April 16, 2026
HomeEducationशिक्षणाधिकारी या पदावर पदवी अधिक बी एड शैक्षणिक पात्रता निश्चित करा !...
spot_img

शिक्षणाधिकारी या पदावर पदवी अधिक बी एड शैक्षणिक पात्रता निश्चित करा ! खाजगी शाळा शिक्षक संघ

शिक्षणाधिकारी या पदावर पदवी अधिक बी एड शैक्षणिक पात्रता निश्चित करा ! खाजगी शाळा शिक्षक संघ

ज्योत्स्ना वानखेडे:

खाजगी शाळा शिक्षक संघाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चंद्रपूर येथे आंदोलन करण्यात आले.

       आंदोलनात शिक्षणाधिकारी या पदावर पदवी अधिक बी एड शैक्षणिक पात्रता निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आजच्या स्थितीत एमपीएससी द्वारे वर्ग एक व दोन पद भरले जाते, पुर्वी ह्या पदासाठी पदवी अधिक बी एड ही शैक्षणिक पात्रता ह़ोती,बी एड अभ्यासक्रमात मानसशास्त्र,   पाठटाचन तसेच वर्गात प्रत्येक्षात शिकविणे ह्या बाबी आवश्यक आहे, ज्यांनी कधीही वर्गावर शिकवले नाही, अशी व्यक्ती शिक्षकांची तपासणी करणार आहे, वेतन पथक अधिक्षक शिक्षणाधिकारी होणे, भ्रष्टाचारास चालना देणे होय असे शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे.

        शिक्षण विभाग व आरोग्य विभागाच्या र्निदेशातुन कोरोना-२०१९ सर्वक्षण कामात मृत्यु पावलेल्या कोरोना योदधा सानुग्रह अनुदान ₹५० लक्ष रक्कम मिळालेली नाही. नागपुर विभागातील, माध्यमिक विभाग जिल्हा परिषद नागपूर मयत रामदास काकडे, बालाजी हायस्कूल हिंगणा, नागपूर तसेच माध्यमिक विभाग जिल्हा गडचिरोली मयत दीपक सोमनकर, बोमनवार हायस्कूल चामोर्शी जिल्हा गडचिरोली यांच्या वारसांना सानुग्रह  अनुदान मिळणे, प्रकरण निकाली काढण्यासाठी मंत्रालयात दर चार लक्ष आहे याचा निषेध आंदोलनात करण्यात आला.

    संच मान्यता, शासन निर्णय दिनांक १५ मार्च २०२५ रद्द करणे,आरटीई जुन्या निकषाप्रमाणे संचमान्यता २०२५-२६ निश्चित करणे, पोर्टलवर व्हॅलीड विद्यार्थी असतांनाही शुण्य संख्या दाखविली जाते, बाबु लिहीतो आणि साहेब स्वाक्षरी करतात असा प्रकार आहे.

       नागपूर जिल्ह्यातील ६३२ शिक्षक-कर्मचारी यांचे माहे मार्च २०२५ पासुन बंद आहे,मा उच्च न्यायालय निर्णय आधारावर, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपुर यांचे वेतन मोकळे करणे याचा आधार घेऊन त्यांचे वेतन मोकळे करणे, खाजगी प्राथमिक शाळेतील मान्यता प्राप्त मुख्याध्यापक यांना अर्जित रजा रोखीकरण लाभ ग्रामविकास विभाग, शासन निर्णय दिनांक ६ डिसेंबर २०२२ व शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांचे पत्र दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ नुसार, शासन निर्णय निर्गमित करणे.

     सीबीएससी व आयसीएससी मान्यता प्राप्त प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-कर्मचारी यांना सेवा समाप्ती, पदोन्नती याबाबत राज्य शासनाच्या शाळा न्यायालयाधिकरण अर्ज करण्यासाठी शिक्षण कायदा-१९७७ व सेवाशर्ती नियमावली १९८१ मध्ये सुधारणा करणे, दिपावली, उन्हाळी व नाताळ सुट्टी बाबत निर्देश प्रधान मंत्री कार्यालय, सीसवा संघटना यांना दिलेले पत्र 12 फेब्रुवारी 2020 ची अंमलबजावणी करणे.

आंदोलनात सर्वश्री किशोर दहेकर, प्रमोद रेवतकर, पितांबर वांढरे, सचिन तपासे,डी के जनबंधु, ए.पी.मांगरुळकर, एस पी येलेकार, रवींद्र फडतरे एम के रामोलवार, के.आर अलोने, गंगाधर खिरटकर, रवींद्र पडवेकर, धनराज मुनघाटे, सुरेश श्रीरामे, संजय चौधरी, आशुतोष गाजेवार, विजय खोब्रागडे, उपस्थित होते.

[फोटौ :- नुतन सावंत उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देताना किशोर दरेकर, रवींद्र जेनेकर, रवींद्र फडतरे, विजय खोब्रागडे व इतर पदाधिकारी]

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page