नागपूर विभागातील अध्यापक विद्यालयात एका जागेवर दोन प्राचार्य नियुक्त, लिपिकाच्या बाबतीतही तोच कारणामा
नागपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या अध्यापक विद्यालयात एका जागेवर दोन प्राचार्य नियुक्त करण्यात आल्याची घटना समोर आलेली आहे. जुने प्राचार्य सन 2021 मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्यापूर्वी 2017 पासून नवीन नियुक्ती दाखवण्यात आलेली आहे. तसेच 45 लाख रुपये थकबाकी उचलण्यात आलेली आहे.
तसेच लिपिक यांचे बाबतीत असाच प्रकार असून, सत्र 2022-23 पर्यंत लिपिक कार्यरत असतांनाही मान्यता सत्र 2016-17 पासून कशाच्या आधारावर देण्यात आली आहे.
शिपाई व विज्ञान सहायक नवीन नियुक्ती भ्रष्टाचार तपासणी केल्यानंतर दिसुन येईल, या मान्यता मान. उल्हास नरड, शिक्षण उपसंचालक यांनी दिलेल्या असल्याचे तपासणीत आढळून येईल. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिनांक 18 मार्च 2026 ला कागदपत्री सुनावणी तसेच स्वाक्षरी सुनावणीच्या वेळी घेण्यात आलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा सुरू आहे.