Thursday, April 16, 2026
HomeSanghtanaवंचित बहुजन आघाडी तर्फे आंदोलन
spot_img

वंचित बहुजन आघाडी तर्फे आंदोलन

वंचित बहुजन आघाडी तर्फे आंदोलन

ज्योत्स्ना वानखेडे:
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या आव्हानानुसार केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशांमध्ये उद्भवलेल्या गॅस सिलेंडरच्या टंचाई बाबत जनतेचा रोष व्यक्त करण्याकरिता दिनांक 6 एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडी द्वारे ” नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर “या घोषणेनंतर अंतर्गत महाराष्ट्रभर आंदोलनाचे आव्हान केले होते. त्याच अनुषंगाने बल्लारपूर वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी तालुका शहर संयुक्त निवेदन मान. तहसीलदार बल्लारपूर मार्फत मान. जिल्हाधिकारी यांना प्रेषित करण्यात आले सदर निवेदनामध्ये मागणी करण्यात आली की, सध्या परिस्थिती सुरू असलेले कृत्रिम वा नैसर्गिक टंचाई दूर करू नागरिकांना अतिशय सिलेंडर उपलब्ध होईल याची व्यवस्था शासन प्रशासनाने करावी व या टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार प्रशासकीय अधिकारी पत्रकार परिषदा घेऊन सांगत सुटले आहे की गॅस सिलेंडरची त्यांचाही नाही तर मग लोकांच्या रांगा का लागलेल्या आहेत. असा प्रश्न उपस्थित करील नरेंद्र कब मिलेंगा सिलेंडर या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली निवेदन देते वेळेस बल्लारपूर शहर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष उमेशभाऊ कडू, महिला आघाडी तालुकाध्यक्ष नम्रता साव, शहराध्यक्षा रेखाताई पागडे, तालुकाध्यक्ष वाघाडे, युवा आघाडी शहराध्यक्ष शुभम नागापुरे, शहर महासचिव गौतमभाऊ रामटेके, शहर संघटक राकेश पेटकर, ज्येष्ठ सल्लागार सत्यभामाताई भाले, देवरामजी नंदेश्वर, प्रजय देवगडे, गोविंदा वनकर, सतीश नगराळे, रवीभाऊ मेश्राम, आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page