Wednesday, April 15, 2026
HomeJayantiप्रचंड उत्साहात साजरी झाली भीम जयंती!
spot_img

प्रचंड उत्साहात साजरी झाली भीम जयंती!

प्रचंड उत्साहात साजरी झाली भीम जयंती!

ज्योत्स्ना वानखेडे:
       विद्यानगर वार्ड, सम्यक चौक येथे ‘सम्यक चौक मित्र मंडळ’ यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.
या मंगलप्रसंगी निळ्या अशोक चक्र ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. हा सोहळा केवळ एक उत्सव नसून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर ठरला.
या कार्यक्रमाला श्री. विशाल वाघ (मुख्याधिकारी, न.प. बल्लारपूर), श्री. रवींद्र भंडारवार (उप-मुख्याधिकारी, न.प. बल्लारपूर), ऍड. पवनभाऊ मेश्राम (नगरसेवक) व श्री. रविभाऊ पुप्पलवार (सामाजिक कार्यकर्ते) यांनी प्रमुख उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमादरम्यान मुख्याधिकारी श्री. विशाल वाघ यांनी विद्यानगर परिसरातील नागरिकांची भावना लक्षात घेऊन ‘सम्यक चौकाचे सौंदर्यीकरण’ करण्याचे महत्त्वपूर्ण आश्वासन दिले. यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
या यशस्वी आयोजनाचे मुख्य नेतृत्व श्री. सुभाष साव यांनी केले. त्यांच्यासह मंडळाच्या सर्व महिला व युवा सभासदांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. अशाच प्रकारे सामाजिक एकोपा जपत आपण पुढे जाऊया, या जिद्दीसाठी संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा! परिसरातील सर्व नागरिक, माता-भगिनी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची रंगत वाढवली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page