*नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप व्यक्ती जखमी, नगरपरिषद प्रशासन गाढ झोपेत*
*ज्योत्स्ना वानखेडे*: नगर परिषदेच्या निष्काळजीपणाचा फटका एका निष्पाप व्यक्तीला बसला आहे. शनिवारी संध्याकाळी 4:30 वाजता येथील गांधी व्यापार संकुलच्या बाजू मध्ये असणाऱ्या नगरपरिषद बल्लारपूर दुकानाच्या चाळीतील संगम साडी सेंटर या दुकानाच्या छत कोसळून, ग्राहक आई मुलगी घायल झाली आहे. लहान मुलीला 14 टाके लावण्याची वेळ व्यापाऱ्यावर आली. यामुळे परिसरात अफरातफर माजली. दोन्ही जखमींना सरकारी दवाखान्यात नेण्यात आले, मुलीचा इलाज चालू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गांधी व्यापार संकुलाच्या बाजूला असलेल्या संगम साडी सेंटर त्या संचालकाने, नगरपरिषद प्रशासनाला दुकानाच्या छताची दुरुस्ती करण्याबाबत लेखी पत्र दिले होते. मात्र जिम्मेदारी झटकून, एसी मध्ये बसून गोष्टी सांगणारे अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि पत्राला केराची टोपी दाखवली. छताची दुरुस्ती न केल्याने गेल्या अनेक दिवसांपासून पाणी गळतीचा त्रास होत होता. शनिवारी अचानक छताचा एक भाग कोसळला.
घटनास्थळी उपस्थित व्यापाऱ्यांनी सांगितले की, अनेक वेळा नगर परिषदेला लेखी तक्रार देऊनही दुरुस्ती केली गेली नाही. “आम्ही कर भरतो, पण सुविधा शून्य आहेत. जर आज एखाद्याचा जीव गेला असता तर जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
व्यापाऱ्यांनी नगर परिषदेच्या या निष्काळजीपणाचा निषेध करत तातडीने दुरुस्तीची आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की नगर परिषद बल्लारपूर फक्त कागदोपत्री काम करते, प्रत्यक्षात जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. या घटने पुन्हा एकदा नगर परिषदेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी संगम साडी सेंटर व्यतिरिक्त इतर सहा दुकाने 40 वर्षापासून आहे परंतु त्यांची डागडुगी शून्य आहे. नगर परिषद चे बांधकाम विभाग कशातून कमिशन मिळते? याबाबत वाट पाहत असल्याची चर्चा बल्लारपूर शहरातील नागरिकांत सुरू आहे.